सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी यांच्या अध्यक्षतेखाली 27 जून रोजी होणार ‘उद्यमी भारत – एमएसएमई दिवस कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 25 JUN 2024 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2024

 

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी ‘उद्यमी भारत – एमएसएमई दिवस कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालय 27 जून 2024 रोजी हा दिवस साजरा करेल. एमएसएमईच्या विकासासाठी आणि शाश्वततेसाठी एमएसएमईडी कायद्यात आवश्यक असलेल्या कायदेशीर सुधारणांवर चर्चा आणि विचार विनिमय करण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे धोरणकर्ते, मोठ्या कंपन्या, वित्तीय संस्था आणि आंतरराष्ट्रीय समुदायासह प्रमुख भागधारकांना मिळणार आहे. कायद्यातील न्यायिक सुधारणांचा एक भाग म्हणून मंत्रालय हा कायदा अधिक समावेशक आणि अधिकारक्षेत्रात सर्वसमावेशक बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. 2006 मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिक बाजूत झालेल्या परिवर्तनासह या कायद्यात बदल करणे हे प्रस्तावित कायदेशीर सुधारणांचे उद्दिष्ट आहे.

एमएसएमईसाठी खटल्याचा खर्च कमी करणे, सूक्ष्म आणि लघु उद्योग लवादाच्या आचरणावर सादरीकरण, लवादासाठी भाषिणीच्या एआय सॉफ्टवेअरच्या वापरावर सादरीकरण,  2006 एमएसएमई कायद्यात सुधारणा अशी चार सत्रे आयोजित केली जाणार आहेत.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जीतन राम मांझी, राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अर्जुन राम मेघवाल उपस्थितांना मार्गदर्शन करतील. जीतन राम मांझी आणि शोभा करंदलाजे यशस्विनी मोहीम राष्ट्राला समर्पित करतील. या कार्यक्रमात एमएसएमई मंत्रालय आणि गोवा, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्यात सामंजस्य करार होतील. इंडिया इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर (आयआयएसी) आणि भाषिणी, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ (एनएसआयसी) आणि ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) आणि भारतीय लघुउद्योग विकास बँक ( सिडबी) आणि भागीदार वित्तीय संस्था यांच्यातही सामंजस्य करार होणार आहेत. उद्यमी भारतच्या निमित्ताने, मंत्रालय मजबूत आणि शाश्वत एमएसएमई परिसंस्थेला चालना देण्यासाठी आपल्या सामूहिक वचनबद्धतेची ग्वाही देत आहे.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2028649) Visitor Counter : 78