जलशक्ती मंत्रालय
केंद्रीय मध्यवर्ती अधिकारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी ‘जल शक्ती अभियान – पावसाचे पाणी साठवा 2024’ विषयक कार्यशाळा व अभिमुख कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन
Posted On:
24 JUN 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2024
राष्ट्रीय जल अभियान, जल शक्ती मंत्रालयाच्या जलस्रोत नदी विकास आणि गंगा संरक्षण विभाग,यांच्या वतीने केंद्रीय मध्यवर्ती अधिकारी आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसाठी ‘जल शक्ती अभियान – पावसाचे पाणी साठवा 2024’ उपक्रमाबाबत कार्यशाळा व अभिमुख कार्यक्रमाचे आज नवी दिल्लीत आयोजन करण्यात आले होते. अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी हे अधिकारी 151 जिल्ह्यांना भेट देणार आहेत. आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय जल शक्ती मंत्री सी.आर. पाटील आणि जल शक्ती राज्यमंत्री डॉ. राज भूषण चौधरी उपस्थित होते.
केंद्रीय मध्यवर्ती अधिकारी आणि तांत्रिक अधिकारी असे पथक त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांचा दोन वेळा दौरा करेल. या दौऱ्यादरम्यान पथकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या अधोरेखित करण्याचा आजच्या कार्यशाळेचा उद्देश होता. ‘जल शक्ती अभियान – पावसाचे पाणी साठवा 2024’ उपक्रम 9 मार्च 2024 ते 30 नोव्हेंबर2024 या कालावधीत ग्रामीण आणि शहरी भागांतील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे. जल संवर्धनात महिलांच्या भूमिकेचे महत्त्व सांगणारी ‘नारी शक्ती द्वारे जल शक्ती’ अशी या उपक्रमाची संकल्पना आहे.
जल क्षेत्रात जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची केंद्रीय मंत्री पाटील यांनी यावेळी प्रशंसा केली. पाण्याची एकत्रित मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. सुरत महानगरपालिकेचा उल्लेख करत त्यांनी प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांना फायदेशीर शुल्क आकारून देणे व जंगल लावण्याबाबत मुद्दे मांडले. पाणी क्षेत्रात जल शक्ती मंत्रालयाच्या विविध योजनांची ग्रामीण भागात परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत बिनसरकारी संस्थांना सामावून घेण्याची आग्रही भूमिका त्यांनी मांडली. कृती-केंद्रीत धोरण व आखणीमार्गे जल सुरक्षित भविष्य निर्मितीसाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028406)
Visitor Counter : 86