वस्त्रोद्योग मंत्रालय

कापूस उत्पादन व वापर समितीची कापूस हंगाम 2023-24 साठी तिसरी बैठक संपन्न


कापड उद्योगांना पुरेसा कच्चा माल उपलब्ध होईल आणि उद्योगांची वाटचाल सुयोग्य मार्गावर सुरू असल्याचे वस्त्रोद्योग आयुक्तांचे प्रतिपादन

Posted On: 24 JUN 2024 8:40PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जून 2024

 

कापूस उत्पादन व वापर समिती (सी.ओ.सी.पी.सी.)ची 2023-24 च्या कापूस हंगामासाठी तिसरी बैठक आज 24 जून 2024 रोजी  वस्त्रोद्योग मंत्रालयातील  वस्त्रोद्योग  आयुक्त रूप राशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्यासह कापड उद्योजकांचे प्रतिनिधी, कापूस व्यापार व जिनिंग, प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. राज्यनिहाय कापसाखालील क्षेत्र, उत्पादन, आयात, निर्यात आणि कापसाचा वापर या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.

बैठकीनंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना  वस्त्रोद्योग  आयुक्त रूप राशी यांनी सांगितले की कापड उद्योगांसाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध आहे. कापसाचा वापर वाढला असून गेल्या दहा वर्षांत यंदाचे वर्ष सर्वाधिक वापराचे दुसरे वर्ष ठरले आहे. वस्त्रोद्योग आयुक्त पुढे म्हणाल्या, “उद्योग सुयोग्य मार्गावर वाटचाल करत असून आकडेवारीतून चांगला वापर झाल्याचे दिसून येईल अशी आम्हाला आशा आहे.” कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी सांगितले की पारदर्शकता आणि चांगल्या कापसाच्या पुरवठ्यासाठी कापसाच्या प्रत्येक गासडीचा क्यूआर कोडच्या आधारे मागोवा घेतला जाईल. त्यामध्ये कोणत्या गावातून कापूस आला, कोणत्या कारखान्यात त्यावर प्रक्रिया झाली आणि विक्रीची तारीख या माहितीचा समावेश असेल.

राज्यनिहाय कापसाखालील क्षेत्र, कापूस उत्पादन तसेच कापूस उत्पादन व वापर समितीने कापूस हंगाम 2022-23 आणि 2023-24 साठी मांडलेला जमाखर्चाचा ताळेबंद पुढीलप्रमाणे:

सी.ओ.सी.पी.सी. ने 2022-23 आणि 2023-24 च्या कापूस हंगामांसाठी 24 जून 2024 रोडी मांडलेला जमाखर्चाचा ताळेबंद

Particulars

2022-23

2023-24 (P)

(In lakh bales of 170 kg. Each)

(in Thousand Tons)

(In lakh bales of 170 kg. Each)

(in Thousand Tons)

SUPPLY

 

 

 

 

Opening Stock

39.48

671.16

61.16

1039.72

Crop

336.60

5722.20

325.22

5528.74

Import

14.60

248.20

12.00

204.00

TOTAL SUPPLY

390.68

6641.56

398.38

6772.46

DEMAND

 

 

 

 

Non-MSME Consumption

197.80

3362.60

204.00

3468.00

MSME Consumption

99.83

1697.11

103.00

1751.00

Non Textile Consumption

16.00

272.00

16.00

272.00

Export

15.89

270.13

28.00

476.00

TOTAL DEMAND

329.52

5601.84

351.00

5967.00

Closing Stock.

61.16

1039.72

47.38

805.46

P-Provisional

 

कापसाखालील क्षेत्र आणि कापूस उत्पादन व वापर समितीने, उत्पादन आणि वापराबाबत 24 जून 2024 रोजी मांडलेला अंदाज

कापूस हंगाम 2022-23 आणि 2023-24

Area: in Lakh Hectares
Production: in Lakh bales of 170 kg.
Yield: Kg per hectare

State

Area

Production*

Yield

2022-23

2023-24 (P)

2022-23

2023-24 (P)

2022-23

2023-24 (P)

Punjab

2.49

2.14

4.44

6.29

303.13

499.67

Haryana

5.75

5.78

10.01

15.09

295.95

443.82

Rajasthan

8.15

10.04

27.74

26.22

578.63

443.96

Total North Zone

16.39

17.96

42.19

47.60

437.60

450.56

Gujarat

24.84

26.83

87.95

90.60

601.91

574.06

Maharashtra

41.82

42.34

83.16

80.45

338.05

323.02

Madhya Pradesh

5.95

6.30

14.33

18.01

409.43

485.98

Total Central Zone

72.61

75.47

185.44

189.06

434.17

425.87

Telangana

19.73

18.18

57.45

50.80

495.01

475.03

Andhra Pradesh

7.04

4.22

15.41

7.25

372.12

292.06

Karnataka

9.49

7.39

25.68

20.47

460.02

470.89

Tamil Nadu

1.73

1.30

3.19

2.78

313.47

363.54

Total South Zone

37.99

31.09

101.73

81.30

455.23

444.55

Odisha

2.16

2.16

7.05

7.05

554.86

554.86

Others

0.12

0.12

0.19

0.21

269.17

297.50

All-India

129.27

126.80

336.60

325.22

442.65

436.02

P= Provisional        
* - Including state-wise loose cotton production

 

(छायाचित्र – रूप राशी,  वस्त्रोद्योग   आयुक्त,  वस्त्रोद्योग  मंत्रालय, भारत सरकार आणि ललित कुमार गुप्ता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.)

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028382) Visitor Counter : 59