राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट

Posted On: 22 JUN 2024 6:25PM by PIB Mumbai

 

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आज (22 जून 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर काही दिवसांनी लगेच  पुन्हा त्यांना भेटून मला आनंद झाल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान शेख हसीना यांचे स्वागत करताना म्हटले.  या नियमित संवादातून मैत्री आणि सहकार्याची चिरस्थायी भावना दिसून येते, ज्याची सुरुवात 1971 च्या बांगलादेशच्या मुक्तिसंग्रामाच्या प्रवासापासून झाली होती, असेही त्या म्हणाल्या.

पंतप्रधान शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशाने लक्षणीय आर्थिक प्रगती केली आहे हे जाणून  आनंद झाल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.

भारत आणि बांगलादेश विविध क्षेत्रात आपले सहकार्य मजबूत करण्यासाठी वेगाने पुढे जात आहेत आणि नवीन क्षेत्रांमध्येही सहकार्य करत आहेत, हे राष्ट्रपतींनी नमूद केले.  यामुळे भारत-बांगलादेश संबंधांची भविष्यातील वाटचाल निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या स्निग्ध आणि सौहार्दपूर्ण संभाषणात, दोन्ही नेत्यांनी आर्थिक संबंध, विकास भागीदारी, संरक्षण सहकार्य, ऊर्जा सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी यासह सर्व क्षेत्रांमध्ये संबंध वाढवण्यासाठी एकत्र काम करण्यावर सहमती दर्शवली.

9 जून 2024 रोजी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर भारत यजमानी करत असलेला परदेशी नेत्यांचा हा पहिला दौरा आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2028018)