माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात नवी दिल्लीतील लोधी गार्डन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Posted On:
21 JUN 2024 6:38PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात आज नवी दिल्लीतील लोधी गार्डन येथे ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी वैष्णव यांनी योग सत्रात भाग घेतला आणि शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नतीकरिता योगाची शक्ती आत्मसात करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित केले. भारतीय योगाभ्यास जागतिक स्तरावर नेण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. योगप्रेमी आज जागतिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणत आहेत. या कार्यक्रमाला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तामिळनाडूमधील निलगिरी संसदीय मतदारसंघांतर्गत पेरियानायकन पलायम परिसरात असलेल्या रामकृष्ण मिशन विद्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन सहभागी झाले होते.
पत्र सूचना कार्यालयाने नॅशनल मीडिया सेंटर येथे योग दिन साजरा केला. कार्यालयाच्या प्रधान महासंचालक शेफाली शरण यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी योगासने केली.
***
S.Kakade/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027794)
Visitor Counter : 71