रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरोग्यसंपन्न  आणि रोगमुक्त जीवनासाठी, गेल्या 10 वर्षांपासून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात योग दिन साजरा केला जात आहे - नितीन गडकरी

प्रविष्टि तिथि: 21 JUN 2024 12:56PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'स्वतःसाठी आणि समाजासाठी योग' या भावनेने आपण आज योग दिन साजरा करत आहोत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

आरोग्यसंपन्न आणि रोगमुक्त जीवनासाठी गेल्या 10 वर्षांपासून योग दिन केवळ भारतातच नव्हे तर जगभरात साजरा केला जात आहे, असे ते म्हणाले.  नागपूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्यात ते सहभागी झाले होते.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन- 2024  साजरा केला.  नवी दिल्लीतील परिवहन भवन येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन, सहसचिव कमलेश चतुर्वेदी आणि डॉ. सुमन सिंग यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

***

S.Kakade/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2027454) आगंतुक पटल : 89
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Hindi_MP , Punjabi , Tamil