माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दिव्यांगसुलभतेवर खास भर


18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिव्यांग व्यक्तींसाठी चित्रपट प्रदर्शनासह सर्वसमावेशकता साजरी

Posted On: 20 JUN 2024 7:50PM by PIB Mumbai

मुंबई, 20 जून 2024

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) 2024 मध्ये, समाजातील विविध घटकांपर्यंत सिनेमाचा आनंद पोहोचवण्यासाठी "दिव्यांगजन फिल्म्स" नावाचा समर्पित उपक्रम प्रदर्शित करण्यात आला. मिफ्फ 2024 मध्ये दिव्यांग व्यक्तींना देखील सहभागी होऊन चित्रपटांचा आनंद घेता यावा यासाठी हे विशेष पॅकेज तयार करण्यात आले होते. ताडदेवच्या व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड आणि मुंबईच्या संस्कार धाम विद्यालयाचे विद्यार्थी विशेष प्रदर्शनाला उपस्थित होते.

‘दिव्यांगजन फिल्म्स’ पॅकेजच्या विशेष प्रदर्शनात भारतीय सांकेतिक भाषा आणि सब टायटलस् असलेले चित्रपट प्रदर्शित केले गेले. हे श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांसाठी होते. तसेच, दृष्टिबाधितांकरिता श्राव्य वर्णनासह चित्रपट दाखवण्यात आले. या पॅकेजमध्ये भारतीय सांकेतिक भाषेचा वापर करून प्रत्यक्ष नृत्य सादरीकरण असलेला एक चित्रपट देखील होता. या उपक्रमाची काही क्षणचित्रे:

मिफ्फ 2024 दरम्यान जेबी हॉल, एनएफडीसी-एफडी संकुलात 'दिव्यांगजन फिल्म्स'चे प्रदर्शन 

 

  

डावा फोटो- डोळ्यावर काळी फीत बांधून श्राव्य वर्णनासह चित्रपट प्रदर्शनाचा अनुभव घेण्यात (दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी) स्वारस्य दाखवलेल्या मिफ्फ प्रतिनिधींना या काळ्या फीत वितरित करण्यात आल्या. 

उजवा फोटो - चित्रपट प्रदर्शनादरम्यान डोळ्यावर पट्टी बांधलेला मिफ्फ प्रतिनिधी

 

दिग्दर्शक आणि शास्त्रीय नृत्यांगना मेथिल देविका यांच्या भाषणाचा सांकेतिक भाषेत अर्थ उलगडताना इंडिया सायनिंग हॅन्ड्सच्या प्रिया सुंदरम 

 

आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक ब्रिज कोठारी आणि टून्स मीडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अब्राहम उथुप यांच्या भाषणाचा सांकेतिक भाषेत अर्थ सांगणाऱ्या प्रिया सुंदरम.

 

दिव्यांगजनांसाठी चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान श्रवणदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्धरण आणि घोषणांचा अर्थ सांकेतिक भाषेत सांगताना भारताच्या प्रिया सुंदरम.

 

मिफ्फ महोत्सव संचालक प्रितुल कुमार यांनी इंडिया साइनिंग हँड्स चे संस्थापक आणि सीईओ यांचा सत्कार केला

 

मिफ्फ महोत्सव संचालक प्रितुल कुमार यांनी 'क्रॉस ओव्हर' ची दिग्दर्शक आणि शास्त्रीय नृत्यांगना मेथिल देविका यांचा सत्कार केला.

 

मिफ्फ महोत्सव संचालक प्रितुल कुमार यांनी आयआयटी दिल्लीचे प्राध्यापक ब्रिज कोठारी आणि टून्स मीडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अब्राहम उथुप यांचा सत्कार केला.

 

    

    

कर्णबधिर आणि श्रवणदोष असणाऱ्या समुदायासाठी भारतीय सांकेतिक भाषा वापरणाऱ्या चित्रपटांची छायाचित्रे 

 

  

भारतीय सांकेतिक भाषेत टाळ्या वाजवणारे विद्यार्थी

 

'क्रॉस ओव्हर' ची दिग्दर्शक आणि शास्त्रीय नृत्यांगना मेथिल देविका तिच्या क्रॉस ओव्हर चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी 

तपशीलवार प्रसिद्धीपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा: https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2024795

 

* * *

PIB Team MIFF | M.Chopade/V.Joshi/D.Rane | 51

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027183) Visitor Counter : 17