नौवहन मंत्रालय

भारतातील 9 प्रमुख बंदरांनी जगातील पहिल्या 100 बंदरांमध्ये स्थान मिळवणे देशासाठी अभिमानास्पद असल्याचे केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन

Posted On: 19 JUN 2024 8:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जून 2024


कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023, च्या  जागतिक बँक आणि एस  अ‍ॅन्ड पी  ग्लोबल मार्केटिंग इंटेलिजन्स यांनी तयार केलेल्या अहवालानुसार भारतातील तब्बल 9 बंदरांनी जगातील पहिल्या 100 बंदरांमध्ये मध्ये स्थान मिळवल्याचे कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स (CPPI), 2023 च्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या आवृत्तीत म्हटले आहे. त्यामुळे भारताच्या बंदर विकास कार्यक्रमाला नवी ऊर्जा मिळाली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी बंदरांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या महत्त्वाकांक्षी सागरमाला कार्यक्रमाला याचे श्रेय दिले आहे.  

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले,“भारतीय बंदरांची ही मोठी कामगिरी आहे, तसेच बंदरांची कामगिरी सुधारण्यासाठी आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचे आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण आणि तांत्रिक दृष्ट्‍या सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या परिश्रमांचा हा दाखला आहे. परिचालनामधील कार्यक्षमता आणि सेवा वितरणाद्वारे जहाजे आणि मालवाहतूक कार्यक्षमतेने हाताळण्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. या संदर्भात सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, भारतीय सागरी क्षेत्र सागरी प्रवेशद्वारांची लवचिकता आणि कार्यक्षमता आणखी सुधारेल आणि बंदरांच्या नेतृत्वाखालील आर्थिक विकासाला चालना देईल.” पिपावाव (41), कामराजर (47), कोचीन (63), हजीरा (68), कृष्णपट्टणम (71), चेन्नई (80) आणि जवाहरलाल नेहरू (96) या सात भारतीय बंदरांनी यादीत पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवले आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2026754) Visitor Counter : 60