सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजना आणि प्रमुख उपक्रमांच्या प्रगतीचा घेतला आढावा

Posted On: 16 JUN 2024 1:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जून 2024

 

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी काल (15.6.2024) राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी. एल. वर्मा यांच्यासमवेत दिवसभर महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला, तसेच पुढील 100 दिवसांसाठी प्रमुख विभागीय उपक्रमांबाबत धोरण आखले.

बैठकीदरम्यान, विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी विभागाच्या उपक्रमांबाबत, तसेच भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळच्या (ALIMCO) आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांबद्दल सर्वसमावेशक सादरीकरण केले.

   

या बैठकीत सहभागी झालेल्यांनी विभागाची पोहोच आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी धोरणात्मक दिशा आणि कृती योजनांवर तपशीलवार चर्चा केली.  ALIMCOचे आधुनिकीकरण दिव्यांगांसाठी मदत आणि सहाय्यक उपकरणे यांमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे, तर CCPD, RCI, NIs आणि NDFDC यांची कामगिरी  सर्वसमावेशक वाढ आणि सक्षमीकरणाप्रति  विभागाची वचनबद्धता अधोरेखित करते.

केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सर्वसमावेशक आणि समन्यायी समाजाच्या निर्मितीसाठी या उपक्रमांच्या महत्त्वावर भर दिला. "समाजातील सर्व घटकांचे सक्षमीकरण आणि समावेशकतेवर भर देणारा एक भक्कम आराखडा तयार करण्याकडे सरकारचे लक्ष आहे.  ALIMCO चे आधुनिकीकरण आणि आमच्या विविध संस्थांचे यश या उद्दिष्टाप्रती असलेल्या आमच्या समर्पणाचे दाखले आहेत", असे त्यांनी नमूद केले.

   

राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी.एल. वर्मा यांनी, या उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या सहयोगी प्रयत्नांवर प्रकाश टाकणाऱ्या याच मुद्यांना दुजोरा दिला. सचिव  राजेश अग्रवाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, वेळेवर आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महत्वाच्या मार्मिक आणि तपशीलवार योजनांची माहिती दिली.

भविष्यातील प्रगतीचा भक्कम पाया रचून, नेमून दिलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, विशेषत: पुढील 100 दिवसांत अथकपणे काम करण्याच्या सरकारच्या सर्वसहमतीपूर्ण  वचनबद्धतेसह बैठकीचा समारोप झाला.

 

* * *

S.Kane/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025660) Visitor Counter : 39