पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवीन ओदिशा सरकारचा शपथविधी संपन्न
ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मोहन चरण माझी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
उपमुख्यमंत्री म्हणून कनक वर्धन सिंह देव आणि प्रवती परिदा यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2024 9:46PM by PIB Mumbai
ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहन चरण माझी यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल त्यांनी कनक वर्धन सिंह देव आणि प्रवती परिदा यांनाही शुभेच्छा दिल्या.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“ओदिशातील हा एक ऐतिहासिक दिवस आहे! ओदिशातील माझ्या बंधू-भगिनींच्या आशीर्वादाने भाजपा राज्यात पहिले सरकार बनवत आहे.
भुवनेश्वरमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला मी उपस्थित होतो. मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल मोहन चरण माझी यांचे आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल कनक वर्धन सिंह देव तसेच प्रवती परिदा यांचे अभिनंदन. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या इतरांचेही अभिनंदन.
मला खात्री आहे की महाप्रभू जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने हा चमू ओदिशात विक्रमी विकास घडवून आणेल आणि असंख्य लोकांचे जीवनमान सुधारेल.”
पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट मध्ये असेही म्हटले आहे;
“पंतप्रधान @narendramodi नवीन ओदिशा सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. त्यांनी श्री @mohanmajhi_BJP मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आज शपथ घेतलेल्या इतर मंत्र्यांचेही पंतप्रधानांनी अभिनंदन केले.
***
JPS/VJ/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024901)
आगंतुक पटल : 122
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam