गृह मंत्रालय
राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापन साहाय्य आयुक्त/सचिव आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), नागरी संरक्षण, गृहरक्षक आणि अग्निशमन सेवा यांच्या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचा आज समारोप
स्थानिक स्तरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन योजना हवी यावर परिषदेत भर
Posted On:
12 JUN 2024 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2024
राज्य/केंद्रशासित प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापन मदत आयुक्त/सचिव आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ),नागरी संरक्षण, गृहरक्षक आणि अग्निशमन सेवा यांच्या यंदाच्या दोन दिवसीय वार्षिक परिषदेचा आज नवी दिल्लीत समारोप झाला.पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा समारोप सत्राचे अध्यक्ष होते. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला आणि गृह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱी यावेळी उपस्थित होते.
आपत्तीला प्रतिसाद देण्याची आणि इतर देशांपर्यंत पोहोचण्याची क्षमता भारतानं दाखवून दिली आहे, असे मिश्रा म्हणाले.दीर्घकाळासाठी आपल्याला मजबूत ठेवतील अशा सहा मंत्रांवर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले-
- आपत्ती व्यवस्थापन प्रत्येक शहर, गाव, खेडे, वाडी, कुटुंब अशा स्थानिक पातळीपर्यंत पोहोचले पाहिजे आणि आपत्तीचा सामना करण्यासाठी जागरूकता, क्षमता आणि साधनसंपत्ती असली पाहिजे.
- समस्यांची पुनरावृत्ती आणि हंगामी समस्या टाळण्यासाठी उपाययोजनांचे संपूर्ण नियोजन केले पाहिजे.
- आपत्ती व्यवस्थापन आता फक्त प्रतिसादापेक्षा आपत्तीतून त्वरित सावरण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
- पूर्वसूचना प्रणाली, कॉमन अलर्ट प्रोटोकॉल, उपग्रहाद्वारे तलावांचे नियमित निरीक्षण, बचाव आणि मदतीसाठी अत्याधुनिक उपकरणे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा हे उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे, असंही ते म्हणाले.
- अर्थव्यवस्था, समाज आणि कल्याणाच्या मार्गात मोठ्या प्रमाणात व्यत्यय आणू शकणाऱ्या कोविड 19 महामारीसारख्या आपत्तीसाठी सज्ज रहा.
- आपत्तींचे व्यवस्थापन एकल एजन्सी, विभाग किंवा मंत्रालय करू शकत नाही. त्यासाठी संपूर्ण सरकार, संपूर्ण समाज असा दृष्टिकोन आवश्यक आहे.
या परिषदेत राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये/विभाग/केंद्र सरकारच्या संस्था आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील एसडी आरएफ/अग्निशमन सेवा यांचे 300 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.
गृह मंत्रालय पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या सहाय्य आयुक्तांची वार्षिक परिषद आयोजित करते. पावसाळ्याच्या कालावधीत उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी या सगळ्यांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ही परिषद भरवली जाते. त्याच बरोबर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडी आरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), नागरी संरक्षण, गृहरक्षक आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या अग्निशमन सेवांसाठी क्षमता निर्माण परिषदही आयोजित केली जाते.
प्रयत्नांमध्ये समन्वय आणण्याच्या दृष्टीकोनातून, तसेच एसडीआरएफच्या बळकटीकरणासाठी आयुक्त/महसूल सचिवांची मदत घेण्याच्या उद्देशाने या वर्षी गृह मंत्रालयाने एकत्रित परिषद आयोजित केली होती.
नैऋत्य मोसमी पावसासाठीच्या तयारीपासून तसेच ग्लेशियर लेक आउटबर्स्ट फ्लड (ग्लॉफ), वणवे आणि रासायनिक, जैविक, किरणोत्सार आणि आण्विक (सीबीआरएन) अशा संभाव्य जोखमींचे व्यवस्थापन कसे करावे या मुद्द्यांवर परिषदेत चर्चा झाली.
N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar
(Release ID: 2024841)
Visitor Counter : 85