मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024
केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. नरेंद्र मोदी सरकारच्या दूरदृष्टी आणि धोरणांच्या अंमलबजावणीत सातत्य राहील, असे पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. सरकारच्या दृष्टिकोनाच्या अंमलबजावणीत येणारे कोणतेही अडथळे दूर करण्यावर त्यांचे लक्ष असेल, असेही ते म्हणाले.

पंचायती राज आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्रीपदाची सूत्रं प्रा. एस. पी. सिंग बघेल यांनी तर मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्रीपदाची सूत्रं जॉर्ज कुरियन यांनी स्वीकारली.

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024423)
आगंतुक पटल : 94