ग्रामीण विकास मंत्रालय
केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकृतपणे ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला
प्रविष्टि तिथि:
11 JUN 2024 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जून 2024

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की ग्रामीण विकासाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्राधान्य असून त्या दिशेने अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेत रोजगार निर्मितीची अफाट क्षमता असून या योजनेअंतर्गत आता मालमत्ता निर्मितीवर भर दिला जात आहे, असे त्यांनी सांगितले. तीन कोटी लखपती दीदींचे सक्षमीकरण हे आपले स्वप्न आहे, असे ते म्हणाले.

S.Kane/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2024300)
आगंतुक पटल : 147