निती आयोग

एटीएल टिंकरप्रेन्युअर 2024: अटल इनोवेशन मिशनने मागवले अर्ज

Posted On: 11 JUN 2024 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024

 

नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशन(AIM) च्या अटल टिंकरिंग लॅब कार्यक्रमांतर्गत प्रतिष्ठेच्या एटीएल टिंकरप्रेन्युअर 2024- या आघाडीच्या समर बूट कॅम्पसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा करण्यास अटल इनोवेशन मिशनला अतिशय आनंद होत आहे. भारतातील बिगर एटीएल शाळांसह सर्व शाळांसाठी हा बूट कॅम्प खुला आहे.

एटीएल टिंकरप्रेन्युअर 2024 सहभागी विद्यार्थ्यांना एका परिवर्तनकारी अनुभवाची हमी देत आहे. जून ते जुलै दरम्यानच्या 40 दिवसात सहभागी विद्यार्थी एका नव्या आभासी प्रवासाला निघतील आवश्यक डिजिटल कौशल्ये आणि चौकट यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणे हे उद्दिष्ट आहे. बूट कॅम्प संपेपर्यंत विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या ऑनलाईन प्रकल्पांच्या संकल्पना  तयार करण्याचे आणि त्या विकसित करण्याचे ज्ञान आणि साधने असतील.

एटीएल टिंकरप्रेन्युअरच्या यापूर्वीच्या आवृत्त्यांमधून त्याचा प्रभाव दिसून आला आहे, ज्यामध्ये 5000 पेक्षा जास्त संघांच्या नावीन्यपूर्ण संकल्पना पाहायला मिळाल्या. यापूर्वीच्या आवृत्तीमध्ये पहिल्या 100 संघांना इंडियन स्कूल ऑफ बिझनेस या प्रतिष्ठेच्या संस्थेकडून मानाची इंटर्नशिप आणि निधीपुरवठ्याच्या संधी मिळाल्या.

नोंदणीकृत संघांना बूट कॅम्पच्या संपूर्ण कालावधीत मेन्टर इंडिया इनिशिएटिव्ह अंतर्गत देशभरातील एआयएमच्या समर्पित  मार्गदर्शकांकडून  समर्पित मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. 20 जून ते 25 जुलै दरम्यान विद्यार्थी डिजिटल, उत्पादन आणि उद्योजकता कौशल्ये यांचा समावेश असलेल्या तज्ञांच्या सहभागाने आयोजित होणाऱ्या सत्रात सहभागी होऊ शकतात, ज्यामध्ये अधिक जास्त प्रमाणात लक्षकेंद्रित दृष्टीकोनासाठी त्यांना अतिशय बारकाईने समजावण्यावर देखील भर दिला जाईल. यावर्षी सहभागींचा अनुभव समृद्ध करण्यासाठी एटीएल टिंकरप्रेन्युअर 2024 इतर अनेक मनोरंजक नवे उपक्रम सुरू करत आहे. यामध्ये टिंकरप्रेन्युअर कॉमिक बुक मालिका, डिझाइन्ड टू इन्स्पायर अँड  मोटिवेट तसेच संकल्पनांची सुलभ उजळणी करण्यासाठी फ्लॅशकार्ड्सचा वापर अशा गोष्टींचा समावेश असेल. याची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी एटीएल टिंकरप्रेन्युअर 2024 साठी खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून 18 जून 2024 या तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी नोंदणी करावीः https://aimapp2.aim.gov.in/atp2024/index.php

सविस्तर माहितीपत्रकासाठी  https://aim.gov.in/pdf/Tinkerpreneur-2024-Brochure.pdf येथे क्लिक करावे.

 

 

S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2024245) Visitor Counter : 40