वस्त्रोद्योग मंत्रालय

पवित्रा मार्गेरिटा यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला

Posted On: 11 JUN 2024 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2024

पवित्रा मार्गेरिटा यांनी आज वस्त्रोद्योग मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. मार्गेरिटा हे आसाममधील मार्गेरिटा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले राज्यसभा सदस्य आहेत.

माजी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री  गिरिराज सिंह यांच्या उपस्थितीत पवित्रा  मार्गेरिटा यांचे पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले.यावेळी वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांच्यासह मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 
S.Kane/B.Sontakke/P.Malandkar

 

 



(Release ID: 2024058) Visitor Counter : 29