निती आयोग

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन,अंतर्गत एआयएम – आयसीडीके वॉटर चॅलेंज 4.0 ची घोषणा

Posted On: 10 JUN 2024 7:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जून 2024

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने अत्यंत अभिमानाने एआयएम – आयसीडीके वॉटर चॅलेंज 4.0 आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना चालना देणाऱ्या उद्योजकांना प्रकाशात आणणाऱ्या 'इनोव्हेशन्स फॉर यू' या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीचे प्रकाशन करत, दोन महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केल्याची घोषणा केली.

भारतातील रॉयल डॅनिश दूतावासातील इनोव्हेशन सेंटर डेन्मार्कच्या सहकार्याने,अटल इनोव्हेशन मिशनने चौथ्या ओपन इनोव्हेशन वॉटर चॅलेंजची घोषणा केली.  हा उपक्रम, इंडो-डॅनिश द्विपक्षीय हरित धोरणात्मक भागीदारीचा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहे, कल्पक उपायांद्वारे पाण्याशी संबंधित गंभीर आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न या उपक्रमांद्वारे केला जातो. निवडलेले संघ  जागतिक नेक्स्ट जनरेशन डिजिटल ॲक्शन कार्यक्रमात सहभागी होणारा भारतीय संघ तयार करतील आणि 9 देशांच्या (भारत, डेन्मार्क, घाना, केनिया, कोरिया, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, घाना,कोलंबिया आणि मेक्सिको) आघाडीच्या विद्यापीठांमधील तरुण प्रतिभावंतांसोबत तसेच नव्या उद्योजकता केंद्रांत सहभागी होतील.

निवडलेल्या संघातील सहभागी तरुणांना सामुदायिक कार्य, बूट कॅम्प सत्रे, बीजभाषण,चर्चासत्रे आणि वैयक्तिक मार्गदर्शनाचा समावेश असलेल्या हायब्रिड इनोव्हेशन प्रवासात सहभागी होण्याची संधी मिळेल.

हा उपक्रम शाश्वत डिजिटल सोल्यूशन्स, सर्वसमावेशकता आणि सार्वत्रिक डिझाइन तत्त्वांचे अन्वेषण करण्यास प्रोत्साहन देतो. याव्यतिरिक्त, सहभागींना 30 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत डेन्मार्क सरकारच्या निधीतून कोपनहेगन येथे नियोजित डिजिटल टेक परीषदेत आपल्या नवकल्पना प्रदर्शित करण्याची संधी मिळेल.

या आव्हानात्मक प्रवासात दोन  विभाग आहेत: एक विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा 35 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुण उद्योजकांसाठी. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्स, संशोधक आणि सकारात्मक पर्यावरणीय बदल घडवून आणण्यासाठी तरुण नवोदितांना  अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी बोलताना,नीती  आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक डॉ. चिंतन वैष्णव म्हणाले, “एआयएम – आयसीडीके वॉटर चॅलेंज 4.0 आणि इनोव्हेशन्स फॉर यू – SDG आन्त्राप्रेन्युअर्स ऑफ इंडियाच्या पाचव्या आवृत्तीची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

10 जून 2024 रोजी अर्ज मागवण्यास सुरुवात असून  इच्छुक अर्जदार 20 जून, 2024 या  अंतिम मुदतीपर्यंत पुढील संकेतस्थळावरून https://aim.gov.in/ICDK-water-innovation-challenge-4.php येथे अर्जाची लिंक पाहू शकतात.

ICDK व्यतिरिक्त, एमने भारतातील एसडीजी उद्योजकांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणारी, ‘इनोव्हेशन्स फॉर यू’ कॉफी टेबल पुस्तकाची पाचवी आवृत्ती देखील यावेळी प्रकाशित केली.  या आवृत्तीत, शाश्वत नवकल्पनांद्वारे सामाजिक उन्नतीसाठी योगदान देत असलेल्या भारताच्या विविध कानाकोपऱ्यातील  60 उद्योजकांचा समावेश आहे.

हे स्टार्टअप्स पुनर्वापर करण्यायोग्य आणि नूतनीकरण करण्यायोग्य साहित्य, हरित ऊर्जा, सर्वसमावेशक शिक्षण आणि वंचित समुदाय आणि स्थानिक कारागीर यांच्या उत्कर्षावर लक्ष केंद्रित करतात. हे पुस्तक https://aim.gov.in/pdf/sdg-coffee-table-book.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2023826) Visitor Counter : 73