राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या शेजारील देशांच्या नेत्यांच्या सन्मानार्थ भारताच्या राष्ट्रपतींनी दिली मेजवानी

Posted On: 09 JUN 2024 11:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,9 जून 2024

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी काल (9 जून, 2024)  रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेल्या शेजारी देशांच्या नेत्यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते.

मेजवानीला उपस्थित राहिलेल्या नेत्यांमध्ये श्रीलंकेचे राष्ट्रपती माननीय रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे अध्यक्ष महामहीम मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपराष्ट्राध्यक्ष महामहीम अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान माननीय श्रीमती शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान माननीय प्रविंद कुमार जुगनाथ आणि श्रीमती कोबिता जुगनाथ, नेपाळचे पंतप्रधान माननीय पुष्प कमल दहल प्रचंड आणि भूतानचे पंतप्रधान माननीय शेरिंग तोबगे या सन्माननीय मान्यवरांचा समावेश आहे;

नेत्यांचे स्वागत करताना नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाचे निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी आपली उपस्थिती भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ धोरणाच्या केंद्रस्थानी असून आणि हिंद महासागर क्षेत्रासाठी आमच्या सागर (SAGAR) धोरणाचे आणखी एक प्रमाण आहे; असे त्यांनी यावेळी नमूद केले. एकमेकांची प्रगती आणि समृध्दीचे सहभागधारक या नात्याने, आम्ही आमच्या जवळच्या मित्रांवर आणि शेजाऱ्यांवर विश्वास ठेवतो जेणेकरून आमच्या प्रदेशात आणि त्यापलीकडे शांतता आणि समृद्धी निर्माण करण्यासाठी हे सर्व आमच्यासोबत काम करतील असे ही त्या यावेळी म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील नागरिकांच्या सेवेची अत्युच्च जबाबदारी स्वीकारल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या.

S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023714) Visitor Counter : 90