मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे आज जाहीर

Posted On: 09 JUN 2024 3:28PM by PIB Mumbai

 

न्यायालय आयुक्त आणि रिटर्निंग ऑफिसर न्यायमूर्ती आशा मेनन (निवृत्त), यांनी आज भारतीय पशुवैद्यकीय परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांची नावे घोषित केली.  भारतीय पशुवैद्यकीय परिषद अधिनियम, 1984 (1984 चे 52) च्या कलम 3 (3) आणि कलम 64 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करत, भारतीय पशुवैद्यकीय परिषद नियम, 1985 च्या नियम 15 मधील उप-नियमा (3) अंतर्गत भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या 11 सदस्यांसाठी 08.06.2024 रोजी निवडणूक घेण्यात आली.

विभागाच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (NIC) खास उद्देशाने विकसित केलेल्या ई-व्होटिंग पोर्टलद्वारे (https://evotevci.dahd.gov.in ) ही निवडणूक घेण्यात आली.  भारतीय पशुवैद्यकीय परिषदेच्या सदस्यांसाठी 08.06.2024 रोजी मतदान झाले.

36,000 हून अधिक नोंदणीकृत पशुवैद्यकीय चिकित्सक पोर्टलचा वापर करून त्यांचा मतदानाचा हक्क बजावू शकले तसेच त्यांनी वापरकर्त्यासाठी अनुकूल पोर्टल विकसित करण्याच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या पुढाकाराचे कौतुक केले.  या पोर्टलमुळे कोणत्याही अडचणीशिवाय जास्तीत जास्त मतदारांना मतदान करता आले.

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग तीन वर्षातून एकदा परिषदेचे अकरा सदस्य निवडण्यासाठी निवडणुका घेतो. या परिषदेत नामनिर्देशित सदस्यांचा देखील समावेश असतो.

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023656) Visitor Counter : 91