पंतप्रधान कार्यालय
शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलांसाठी आपल्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार.
क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं.
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2024 8:51AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलांसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतीय विद्यापीठांच्या कामगिरीत सुधारणा झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारतीय विद्यापीठांनी कामगिरीत सतत सुधारणा करण्याबद्दल क्यूएस क्वाक्वेरेली सायमंड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नुन्झिओ क्वाक्वेरेली यांच्या पोस्टला प्रतिसाद देताना, पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“गेल्या दशकात आम्ही शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक बदलांवर लक्ष केंद्रित केले आहे. हे क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारीतून स्पष्ट होते आहे. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संस्थांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल अभिनंदन. या कार्यकाळात, संशोधन आणि नवोन्मेष वाढवण्यासाठी आम्हाला आणखी काही काम करायचे आहे.”
***
NM/S.Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023385)
आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam