भारतीय निवडणूक आयोग

सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदान केंद्रांवर 65.79% मतदानाची नोंद


सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या टप्पा -7 मध्ये 63.88 % मतदान

Posted On: 06 JUN 2024 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

भारतीय निवडणूक आयोगाच्या दिनांक 01.06.2024 च्या दोन प्रसिद्धिपत्रानुसार आणि आधीच्या टप्प्यांमधील  मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यासाठी अनुसरण केलेल्या पद्धतीनुसार, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 57 मतदान केंद्रांवर टप्पा-7 मध्ये 63.88% मतदान झाले आहे.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान केंद्रांवर एकूण 65.79% मतदान झाले. टपाली मतांची संख्या आणि एकूण मतदानाचा तपशीलवार सांख्यिकीय अहवाल हा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडून नियमित प्रक्रियेनुसार प्राप्त झाल्यावर अंतिम तपशील भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाईल. टपाली मतपत्रिकेत संरक्षण सेवांमधील मतदार, उपस्थितीतून सूट मिळालेले मतदार (85+, दिव्यांग, अत्यावश्यक सेवा इ. मधील) आणि निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना दिलेल्या टपाली मतपत्रिका समाविष्ट आहेत.

सातव्या टप्प्यासाठी लिंगनिहाय मतदानाची आकडेवारी खाली दिली आहे:

टप्पा

पुरुष मतदान

महिला मतदान

तृतीयपंथी मतदान

एकूण मतदान

टप्पा 7

63.11

64.72

22.33

63.88

2. टप्पा 7 साठी राज्यवार आणि मतदान केंद्र निहाय मतदानाची माहिती अनुक्रमे तक्ता 1 आणि 2 मध्ये दिलेली आहे. टप्पा 7 साठी मतदारांची एकूण संख्या तक्ता 3 मध्ये दिली आहे.

टीप: "इतर मतदार" च्या बाबतीत रिक्त सेल त्या श्रेणीतील नोंदणीकृत नसलेले मतदार दर्शवतो

All Phase  - Table 1,2,3,4

 

* * *

S.Kane/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023271) Visitor Counter : 106