पंतप्रधान कार्यालय
भूतानच्या पंतप्रधानांकडून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन
पंतप्रधान त्शेरिंग तोबग्ये यांनी पंतप्रधानांच्या दूरदर्शी नेतृत्वाची केली प्रशंसा
भूतान सोबत असलेल्या अनुकरणीय भागीदारीप्रती भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून पुनरुच्चार
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2024 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबग्ये यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी केला आणि 18 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदी यांच्या गेल्या दशकातील दूरदर्शी नेतृत्वाची पंतप्रधान तोबग्ये यांनी प्रशंसा केली तसेच तिसऱ्या यशस्वी कार्यकाळासाठी त्यांनी मोदींना सदिच्छा दिल्या.
पंतप्रधान तोबग्ये यांच्या प्रशंसेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले. भूतानसोबतच्या अनुकरणीय भागीदारीला भारत सर्वोच्च प्राधान्य देतो अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्री आणि सहकार्याचे अनोखे बंध आणखी दृढ करण्याप्रती भारताच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी यावेळी पुनरुच्चार केला.
भारत आणि भूतान यांच्यातील भागीदारी सर्व स्तरांवर दृढ विश्वास, सद्भावना आणि परस्पर सामंजस्य यावर आधारित आहे तसेच ही भागीदारी दोन्ही देशांतील जनतेमध्ये असलेले दृढ संबंध आणि सखोल आर्थिक तसेच विकासात्मक भागीदारीमुळे अधिक मजबूत झाली आहे.
* * *
S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2023219)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Khasi
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam