पंतप्रधान कार्यालय

मॉरीशसच्या पंतप्रधानांतर्फे पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन


हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वास आहे ही बाब पंतप्रधान जुगनाथ यांनी केली अधोरेखित

दोन्ही नेत्यांनी भारत-मॉरीशस यांच्यातील भागीदारीप्रती असललेल्या कटिबद्धतेचा केला पुनरुच्चार

Posted On: 05 JUN 2024 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद के.जुगनाथ यांनी अभिनंदनपर दूरध्वनी केला. पंतप्रधान मोदी यांनी ऐतिहासिकरित्या सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ मिळवल्याबद्दल  पंतप्रधान जुगनाथ यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की हा विजय म्हणजे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रमाणावरील निवडणूकीची लोकशाही प्रक्रिया यशस्वीपणे आणि प्रेरणादायी पद्धतीने राबवल्याबद्दल देखील पंतप्रधान जुगनाथ यांनी त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान जुगनाथ यांचे आभार मानले आणि भारत आणि मॉरीशस यांच्या दरम्यान असलेला विशेष नातेसंबंध आणखी बळकट करण्याप्रती तसेच सर्व क्षेत्रांतील दीर्घकालीन द्विपक्षीय सहकार्य आणखी दृढ करून दोन्ही देशांतील जनतेदरम्यानचे बंध आणखी बळकट करण्याप्रती वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

 

* * *

JPS/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023113) Visitor Counter : 32