पंतप्रधान कार्यालय
भारतातील 18 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाल्याबद्दल पंतप्रधानांचे जागतिक नेत्यांनी संदेश पाठवून केले अभिनंदन
या अभिनंदनाच्या संदेशांबद्दल पंतप्रधानांनी मानले जागतिक नेत्यांचे आभार
Posted On:
05 JUN 2024 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2024
भारतातील 18 व्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाल्याबद्दल अभिनंदनाचे संदेश पाठवणाऱ्या जागतिक नेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. मोदी यांनी एक्स या समाजमाध्यम मंचावर जागतिक नेत्यांच्या संदेशांना उत्तर दिले आहे.
मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद कुमार जगन्नाथ यांनी केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “प्रवींद कुमार जगन्नाथजी तुम्ही अतिशय जिव्हाळ्याने पाठवलेल्या संदेशाबद्दल मी तुमचे आभार मानतो. आमचे शेजाऱ्यांना प्राधान्य हे धोरण, व्हिजन सागर आणि ग्लोबल साऊथविषयीची बांधिलकी यांच्या एकीकरणामध्ये मॉरिशस महत्त्वाची भूमिका बजावतो. आपली ही विशेष भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी आपण एकत्र काम करू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.''
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, ”जिव्हाळ्याच्या संदेशाबद्दल माझे मित्र पंतप्रधान शेरिंग तोबगे यांचा मी आभारी आहे. भारत-भूतान संबंध जास्तीत जास्त बळकट होत राहतील.”
नेपाळचे पंतप्रधान कॉम्रेड प्रचंड यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “पंतप्रधान कॉम्रेड प्रचंडजी तुमच्या संदेशाबद्दल मी तुमचा आभारी आहे. आपल्यामध्ये सुरू असलेले सहकार्य भारत-नेपाळ मैत्री अधिक बळकट करेल, अशी मला अपेक्षा आहे.”
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “रानिल विक्रमसिंघेजी मी तुमचे आभार मानतो. भारत-श्रीलंका आर्थिक भागीदारीवरील आपले सहकार्य पुढे सुरू राहील, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.”
श्रीलंकेचे कार्यकारी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “ माझे मित्र महिंदा राजपक्षे तुमच्या शुभेच्छांबद्दल मी आभारी आहे. भारत-श्रीलंका भागीदारी नवे टप्पे सर करत असताना, तुमचे पाठबळ पुढे सुरु राहील अशी अपेक्षा आहे.”
श्रीलंकेचे फील्ड मार्शल सरथ फोन्सेका यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, “सरथ फोन्सेका तुमचे मी आभार मानतो. श्रीलंकेबरोबर आमचे संबंध विशेष आहेत. ते अधिक सखोल आणि बळकट करण्यासाठी आम्ही श्रीलंकेच्या जनतेसोबत काम करणे पुढे सुरू ठेवू.”
श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते सजिथ प्रेमदासा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले;
“साजिथ प्रेमदासा, तुमच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद! श्रीलंकेसोबतचे आमचे संबंध खास आणि बंधुत्वाचे आहेत. आमच्या शेजारी प्रथम धोरणानुसार आपले अतूट बंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत!”
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले; “पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी शुभेच्छांबद्दल धन्यवाद. सामायिक मूल्ये आणि हितसंबंधांवर आधारित भारत-इटली धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जागतिक हितासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.”
मालदीवचे राष्ट्रपती डॉ मोहम्मद मुइज्जू यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “धन्यवाद राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू. मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातील आमचा मौल्यवान भागीदार आणि शेजारी देश आहे. मी देखील आपले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी सर्वोच्च सहकार्याची अपेक्षा करतो.”
मालदीवचे उपराष्ट्रपती हुसेन मोहम्मद लतीफ यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“उपराष्ट्रपती सेम्बे तुमच्या संदेशाबद्दल धन्यवाद. द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आपण एकत्र काम करत राहू.”
मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“मोहम्मद नशीद, तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. भारत-मालदीव संबंध वृद्धिंगत करण्यासाठी तुमच्या सततच्या पाठिंब्याचा आम्ही आदर करतो.”
मालदीवचे राजकारणी आणि संयुक्त राष्ट्र महासभेचे माजी अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले; “अब्दुल्ला शाहिद, तुमच्या हार्दिक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. मालदीवसोबत आमचे संबंध नवीन उंची गाठताना पाहण्याची तुमच्या प्रमाणेच आमचीही इच्छा आहे.”
जमैकाचे पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस यांच्या पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधान म्हणाले; “पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस धन्यवाद. भारत-जमैका संबंध हे शतकानुशतके जुने असून ते सामान्य जनतेच्या मनाशी जोडलेले आहेत. आपल्या जनतेच्या कल्याणासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
बार्बाडोसच्या पंतप्रधान मिया अमोर मोटली यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
“पंतप्रधान मिया अमोर मोटली यांचे आभार. आपल्या जनतेच्या कल्याणासाठी भारत आणि बार्बाडोस यांच्यात मजबूत भागीदारी वृद्धिंगत व्हावी यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.”
* * *
S.Kakade/Shailesh/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2022913)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam