संरक्षण मंत्रालय

मेजर जनरल हर्ष छिब्बर यांनी सिकंदराबाद इथल्या लष्करी व्यवस्थापन महाविद्यालयाचे कमांडट म्हणून स्विकारला पदभार

Posted On: 01 JUN 2024 9:32AM by PIB Mumbai

 

मेजर जनरल हर्ष छिब्बर यांनी काल 31 मे 24 रोजी सिकंदराबाद इथल्या लष्करी व्यवस्थापन महाविद्यालयाचे कमांडट म्हणून रुजू झाले. त्यांनी काल रिअर अॅडमिरल संजय दत्त यांच्याकडून कंमांडट पदाचा कार्यभार स्वीकारला. मेजर जनरल हर्ष छिब्बर हे राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. ते डिसेंबर 1988 मध्ये भारतीय लष्कराच्या सेवेत रुजू झाले होते. मेजर जनरल हर्ष छिब्बर यांनी सार्वजनिक धोरण या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अर्थात पीएचडी केली आहे, याशिवाय त्यांनी व्यवसाय व्यवस्थापन आणि सार्वजनिक प्रशासन या दोन विषयांमध्येही ए.फील. ही पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी तांत्रिक कर्मचारी अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रम, [Technical Staff Officers Course (TSOC)] उच्च स्तरीय संरक्षण व्यवस्थापन प्रशिक्षण अभ्यासक्रम [Higher Defence Management Course (HDMC)] आणि सार्वजनिक प्रशासनविषयक प्रगत व्यवसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे [and the Advanced Professional Programme in Public Administration (APPPA)] अध्यापनही केले आहे. मेजर जनरल छिब्बर यांचा लष्करी सेवेतला अनुभव विविधांगी आणि व्यापक असून, त्यांनी लष्कराच्या पूर्व, उत्तर आणि पश्चिम क्षेत्रात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मेजर जनरल छिब्बर यांनी पॅरा एएससी कंपनीचे, एएससी बटालियन आणि एएससी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. लष्कराच्या पूर्व क्षेत्रीय माहिती यंत्रणेचे ब्रिगेडियर जनरल स्टाफ म्हणून, तसेच उत्तर क्षेत्रीय दळवळण आणि वाहतूक विभागाचे (ऑपरेशनल लॉजिस्टिक्स) मेजर जनरल म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. आर्मी सर्व्हिस कॉर्प्स सेंटर अँड कॉलेजचे प्रशिक्षक तसेच लष्करी व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वित्तीय व्यवस्थापन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी काही सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशनही विकसीत केली असून, ते अनेक विभागांमध्ये प्रत्यक्षात वापरात आहेत.

***

S.Pophale/T.Pawar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022437) Visitor Counter : 60