भारतीय निवडणूक आयोग

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या सहाव्या टप्प्यात 63.37 टक्के मतदानाची नोंद


सहाव्या टप्प्यात मतदान केलेल्या मतदारांची वास्तविक आकडेवारी जाहीर

सातव्या टप्प्यातील मतदानासाठी लोकसभा मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी जाहीर

Posted On: 28 MAY 2024 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2024

 

हे निवेदन भारत निवडणूक आयोगाने 25. 05. 2024 रोजी जारी केलेल्या दोन प्रसिद्धीपत्रकांचाच पुढचा भाग आहे. सध्या सुरु असलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 साठी सहाव्या टप्प्याअंतर्गत 58 लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निवडणुकीत 63.37% मतदानाची नोंद झाली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदानाची लिंगनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

टप्पा

पुरुष मतदान टक्केवारी

महिला मतदान टक्केवारी

तृतीयपंथी मतदान टक्केवारी

एकूण मतदान टक्केवारी

टप्पा 6

61.95%

64.95%

18.67%

63.37%

2. सहाव्या टप्प्यातील राज्यनिहाय आणि लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी अनुक्रमे तक्ता 1 आणि 2 मध्ये दिली आहे. सहाव्या टप्प्यातील मतदान केलेल्या मतदारांची पूर्ण संख्या तक्ता 3 मध्ये दिली आहे. या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रासाठीच्या अर्ज क्र.  17 C ची एक प्रत, उमेदवारांना त्यांनी त्यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या व्यक्तींच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोहचवली गेली आहे. अर्ज क्र. 17 C मध्ये नमूद वास्तविक माहिती मतदानाच्या दिवशीच उमेदवारांसोबत सामायिक केली जात असल्याने ही माहिती तिथून ती मिळवता येऊ शकेल, पडताळली जाऊ शकेल. टपाली पद्धतीने आलेल्या मतांची मतमोजणी झाल्यानंतरच, आणि या मतांची मतमोजणीला जोड दिल्यानंतरच मतदानाची अंतिम आकडेवारी उपलब्ध होऊ शकणार आहे. टपाली पद्धतीच्या मतांमध्ये सेवा मतदार, अबसेंटी वोटर (85+ वयाचे, दिव्यांग, अत्यावश्यक सेवा इ.) आणि निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेले मतदार यांनी दिलेल्या टपाली मतपत्रिकेचा समावेश असतो. अशा प्रकारच्या प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांचा दैनंदिन तपशील सर्व उमेदवारांना दिला जातो.

3. या माहितीसोबतच येत्या 1 जून 2024 रोजी सातव्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या 57 लोकसभा मतदारसंघांतील नोंदणीकृत मतदारांचा तपशील तक्ता क्र. 4 मध्ये दिला आहे.

Phase 6 - Table 1, 2, 3, Phase 7 - 4.... येथे क्लिक करा

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021997) Visitor Counter : 165