दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

दूरसंचार विभाग आणि एनटीआयपीआरआयटी कडून देशभरातली 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 220 पेक्षा अधिक संचार मित्रांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 28 MAY 2024 5:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 मे 2024

 

संचार मित्र उपक्रमातील स्वयंसेवकांसाठी आयोजित जनजागृती कार्यशाळा आज पार पडली. दूरसंचार विभागाने गाजियाबाद इथल्या एनटीआयपीआरआयटी संस्थेच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. संचार मित्र उपक्रमांतर्गत दूरसंचार विभागाने विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून सहभागी करून घेतले आहे.  दूरसंचार विभागाच्या विविध नागरिककेंद्रित सेवा तसेच सायबर फसवणुकीच्या धोक्यांविषयी जनजागृती करणे आणि त्याद्वारे डिजिटल विश्वात नागरिकांना सुरक्षितपणे आणि सुलभरित्या वावरण्याच्या दृष्टीने त्यांचे सक्षमीकरण करण्याची जबाबदारी या स्वयंसेवक विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली आहे.

 

A person sitting in a chairDescription automatically generated

Smt Madhu Arora, Member (T), Digital Communication Commission, addressing Sanchar Mitras during the workshop

केंद्र सरकारने देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांसाठी 5G तंत्रज्ञानाचा वापर आणि संशोधनविषयक उपलब्ध करून दिलेल्या 100 प्रयोगशाळांपैकी (100 5G Use Case Labs.), ज्या नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रगोगशाळा स्थापन झाल्या आहेत, अशा प्रतिथयश शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांची संचार मित्र म्हणून निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत देशभरातील भारतभरातील 250 हून अधिक विद्यार्थी संचार मित्र स्वयंसेवक म्हणून या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

 

A screenshot of a video callDescription automatically generated

220+ Sanchar Mitras from 20+ States/UTs participated in the workshop

डिजिटल संवाद आयोगाच्या सदस्य (दूरसंवाद) मधू अरोरा यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटनीय सत्रात संचार मित्रांसोबत संवाद साधला. आजच्या डिजिटल जगात दूरसंचार यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सध्या प्रचलित असलेले डिजिटल कल आणि घडामोडींविषयींबाबत  नागरिकांना माहिती असणे आवश्यक झाले आहेत, त्यादृष्टीनेच याबाबत जनजागृती करणे आणि नागरिकांचे सक्षमीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नांमधले एक पाऊल म्हणजे  संचार मित्र हा उपक्रम आहे, अशी भूमिका त्यांनी आपल्या संवादातून यावेळी व्यक्त केली.

संचार मित्र म्हणजे आपल्या समाजातील परिवर्तनाचे दूत आहेत. दूरसंचार विभागाचे उपक्रम आणि या उपक्रमांच्या माध्यमातून ज्या नागरिकांपर्यंत सेवा पोहचवण्याचा उद्देश समोर ठेवला आहे, अशा दोन्ही घटकांमधील दरी कमी करण्याचे काम हे दूत करतात, विशेषत: दुर्गम भागात जिथे माहिती उपलब्ध होण्याची संधी आणि सोय मर्यादित आहे अशा ठिकाणी हे दूत कामी येतात अशा शब्दांत मधू अरोरा यांनी संचार मित्रांच्या कामाचे महत्व अधोरेखीत केले. संचार मित्र स्वयंसेवकांची व्यवस्था म्हणजे नागरिकांचे अभिप्राय समजून घेण्यात उपयुक्त ठरणारी  महत्वाची यंत्रणा असल्याचे नमूद करत, मधू अरोरा यांनी दुतर्फा संवादाचे महत्त्वही आपल्या संबोधनातून उपस्थितांसमोर मांडले.

Shri Deb Kumar Chakraborti, Director General, NTIPRIT addressing the Sanchar Mitras during the workshop

संचार मित्र स्वयंसेवकांमुळे दूरसंचार विभागाला नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांविषयी महत्वाची माहिती मिळते, आणि या माहितीच्या आधारे विभागाला  उत्तम धोरणे  आखण्यात मदत मिळते ही बाबही त्यांनी अधोरेखीत केली.  दूरसंचार आणि संबंधित क्षेत्रांमध्ये येऊ घातलेल्या काळाच्या दृष्टीने अनेक संधी दडलेल्या आहेत, या संधीचा शोध घेत लाभ करून घेण्याकरता, संचार मित्रांनी त्यांना उपलब्ध झालेल्या या अभिनव  व्यासपीठाचा पूरेपूर वापर करून घ्यावा असे आवाहनही मधू अरोरा यांनी यावेळी केले.

दूरसंचार विभागाने नैसर्गिक आपत्तींच्या काळात नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने संचार साथी या उपक्रमाच्या माध्यमातून राबवलेल्या अनोख्या उपाययोजनेसाठी मधू अरोरा यांनी विभागाच्या प्रयत्नांची प्रशंसा केला. या कार्यशाळेत भारताच्या तांत्रिक उत्पादन कौशल्याचे अनोखे दर्शनही घडवण्यात आले. त्याअंतर्गत मैलाचा दगड ठरलेल्या 4 जी आणि 5 जी तंत्रज्ञानासाठी स्वदेशी ढाचा तयार करण्यासारखे प्रयत्न यावेळी अधोरेखीत केले गेले.

 

* * *

S.Kane/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021968) Visitor Counter : 51