आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद करणार प्रगती-2024 चे आयोजन

Posted On: 27 MAY 2024 2:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मे 2024

 

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत असलेली केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद(सीसीआरएएस) ही स्वायत्त संस्था नवी दिल्लीत इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे “फार्मा रिसर्च इऩ आयुर्ग्यान अँड टेक्नो इनोवेशन (प्रगती-2024)”  या परिषदेचे 28 मे 2024 रोजी आयोजन करणार आहे. सीसीआरएएस आणि आयुर्वेदिक औषध उद्योग यांच्या दरम्यान संशोधन संधींचा शोध घेण्यावर आणि सहकार्याला चालना देण्यावर या परस्पर संवादात्मक बैठकीत भर दिला जाईल.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. आयुर्वेदाच्या विकासात उद्योगाची भूमिका यावर त्यांचे बीजभाषण होईल.  

या बैठकीची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

  1. ‘सीसीआरएएस’ ने विकसित केलेले तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या फलनिष्पत्तीचा वापर करणे.
  2. दर्जा नियंत्रण, औषध प्रमाणीकरण, उत्पादन विकास आणि प्रमाणीकरण यामध्ये एक भक्कम जाळे प्रस्थापित करणे.
  3. स्वतःच्या संशोधन आणि विकास सुविधा असलेल्या सक्षम उद्योग भागीदारांची निवड करणे.
  4. औषध निर्मिती आणि उत्पादन विकासातील संशोधकांच्या क्षमता उभारणीसाठीच्या संधींचा शोध घेणे.
  5. आयुर्वेद व्यावसायिकांना स्टार्ट अप्स आणि इन्क्युबेटिंग केंद्र सुरू करण्यासाठी सहाय्य करणे, आयुर्वेदिक औषधनिर्मिती उद्योजकतेला प्रोत्साहन देणे.

या कार्यक्रमात चार विशेष तांत्रिक सत्रे होणार आहेत.

देशभरात 35 औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत. हिमालया, इमामी, बैद्यनाथ, डाबर, आयएमपीसीएल, आर्य वैद्यशाळा, औषधी आणि आयएमपीकॉप्स यांसारख्या काही नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही त्यात समावेश आहे.त्याशिवाय सीआयआय, आयुष एक्सिल, पीसीआयएमएच आणि एनआरडीसी यांच्या निमंत्रित तज्ञांनी देखील संवाद बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे.

सीसीआरएएस सोबत सहकार्य करण्यासाठी इच्छुक असलेल्या सक्षम उद्योग भागीदारांची निवड करणे, शास्त्रीय ज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि संशोधनाच्या निष्कर्षांचा आणि आयुर्वेदिक औषधांच्या विकासातून निर्मित उत्पादनांचा वापर करणे ही प्रगती-2024 ची अपेक्षित फलनिष्पत्ती आहे. या उपक्रमामुळे या उद्योगातील जाळ्याचा आणि संस्थात्मक संपर्काचा विस्तार होईल, ज्यामुळे साहजिकच आयुर्वेदिक दवाखाने आणि रुग्ण यांना त्याचा लाभ मिळेल. 

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2021783) Visitor Counter : 136