वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

जागतिक बौद्धिक संपदा संघटना करार, हा भारत आणि विकसनशील देशांसाठी  (ग्लोबल साऊथ) मोठा विजय

Posted On: 26 MAY 2024 5:47PM by PIB Mumbai

 

बौद्धिक संपदा, अनुवंशिक साधनसंपत्ती आणि संबंधित पारंपरिक ज्ञानावरील जागतिक बौद्धिक संपदा संघटना (WIPO) करार, पारंपरिक माहिती आणि ज्ञानाच्या विपुलतेने भरलेले  एक भव्य जैवविविधतापूर्ण भांडार असलेल्या विकसनशील  (ग्लोबल साऊथ) देशांसाठी आणि भारतासाठी एक महत्त्वपूर्ण विजय आहे.

शतकानुशतके अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृतींना आधार देणारी ज्ञान आणि माहितीची व्यवस्था आता जागतिक बौद्धिक संपदा ( IP ) प्रणालीमध्ये कोरली गेली आहे.  प्रथमच स्थानिक समुदाय आणि त्यांची आनुवंशिक साधनसंपत्ती (जीआर ), तसेच  संलग्न पारंपरिक ज्ञान (एटीके) यांच्यातील संबंधांना जागतिक आयपी  समुदायामध्ये ओळख लाभली आहे.

हा करार केवळ जैवविविधतेचे संरक्षण करुन तिच्याबाबत खबरदारीच बाळगणार नाही, तर स्वामित्व हक्क (पेटंट) प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवेल आणि नवोन्मेषाला चालना देईल.  याद्वारे, आयपी प्रणाली सर्व देशांच्या आणि त्यांच्या समुदायांच्या गरजा भागवत अधिक सर्वसमावेशक मार्गाने विकसित होत  नवकल्पनांना प्रोत्साहन देणे सुरू ठेवू शकते.

हा करारदीर्घकाळापासून या माध्यमाचे पुरस्कर्ते राहिलेल्या भारतासाठी आणि  ग्लोबल साऊथ साठी मोठा विजय ठरतो.  दोन दशकांच्या वाटाघाटीनंतर आणि सामूहिक पाठबळाने हा करार बहुपक्षीय मंचावर 150 हून अधिक देशांच्या सहमतीने स्वीकारण्यात आला आहे.

सध्या, केवळ 35 देशांमध्ये काही प्रकारची प्रकटीकरणाबाबतची बंधने आहेत, त्यापैकी बहुतेक अनिवार्य नाहीत आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी योग्य प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गणली जात नाहीत.  विकसित जगासह करार करणाऱ्या पक्षांना, त्यांच्या विद्यमान कायदेशीर चौकटीत, पेटंट अर्जदारांवरील मूळ दायित्वांच्या प्रकटीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी, या करारामुळे बदल करणे आवश्यक आहे.

भारताने शतकानुशतके पुरस्कार केलेल्या, सामूहिक विकास  साध्य करण्याच्या आणि शाश्वत भविष्याचे वचन देण्याच्या प्रवासाची, हा करार म्हणजे सुरुवात आहे.

***

S.Kane/A.Save/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021737) Visitor Counter : 66