संरक्षण मंत्रालय

सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी बेंगळुरूमधील विमाने आणि प्रणाली चाचणी आस्थापना तसेच वायु सेना चाचणी वैमानिक विद्यालयाला दिली भेट


जनरल अनिल चौहान यांनी एएफटीपीएस येथील 46 व्या फ्लाइट टेस्ट अभ्यासक्रमाच्या समापन कार्यक्रमाचे भुषविले अध्यक्षपद

Posted On: 25 MAY 2024 2:59PM by PIB Mumbai

 

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, जनरल अनिल चौहान यांनी 24 मे 2024 रोजी बेंगळुरू येथील विमाने आणि प्रणाली चाचणी आस्थापना (एएसटीई) आणि वायु सेना चाचणी वैमानिक विद्यालय (एएफटीपीएस) या ठिकाणांना भेट दिली. यावेळी एका औपचारिक संचलनाचे आयोजन करण्यात आले.  उड्डाण चाचणी घेत असताना आपल्या जीवनाचे बलिदान देणाऱ्या भारतीय चाचणी चमूचे सदस्य आणि शास्त्रज्ञांच्या स्मारकाला जनरल अनिल चौहान यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. या दौऱ्याचा एक भाग म्हणून जनरल चौहान यांना भारतीय वायु सेनेच्या एएसटीई येथे सुरू असलेल्या चाचण्या आणि एएफटीपीएसच्या उड्डाण चाचणी प्रशिक्षण उपक्रमांबरोबरच या अद्वितीय संस्थांच्या संघटनात्मक भूमिकांच्या पैलूंबद्दल माहिती देण्यात आली. आत्मनिर्भरता आणि प्रशिक्षणसंबंधी पायाभूत सुविधांचा एक भाग म्हणून एएसटीई आणि एएफटीपीएस येथे उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती त्यांनी घेतली आणि त्यांच्यासमोर स्वदेशी प्रकल्पांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.  सी डी एस जनरल चौहान यांनी एएसटीई आणि एएफटीपीएसच्या पाच दशकांच्या दीर्घ प्रवासातील महत्त्वपूर्ण ऐतिहासिक टप्पे दर्शविणाऱ्या कलाकृती ठेवलेल्या एएसटीई संग्रहालयाला देखील भेट दिली.

जनरल अनिल चौहान हे, एएफटीपीएस येथे आयोजित 46 व्या फ्लाइट टेस्ट कोर्सच्या समापन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले.  एकूण 17 विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवीधर झाले आहेत.  एएसटीईने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पारंपरिक सुरंजन दास रात्रीभोजाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पदवीधर विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या वैवाहिक जोडीदारांनाही पात्रता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.  विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाच विद्यार्थ्यांना चषक प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चाचणी वैमानिकाला दिला जाणारा सुरंजन दास चषक स्क्वाड्रन लीडर ए. बेरवाल यांना; सर्वोत्कृष्ट उड्डाण मूल्यांकनासाठी दिला जाणारा सी ए एस चषक स्क्वाड्रन लीडर कपिल यादव यांनामहाराजा हनुमंत सिंहजी तलवार सर्वोत्कृष्ट एफटीई पुरस्कार स्क्वाड्रन लीडर व्ही सुप्रिया यांना; अभ्यासक्रमातील विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा कपिल भार्गव चषक स्क्वाड्रन लीडर रजनीश राय यांना आणि सर्वोत्कृष्ट उड्डाण मूल्यांकनासाठी दिला जाणारा डनलॉप चषक लेफ्टनंट कमांडर गौरव त्यागी यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाला भारतीय वायुसेनेचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चिफ - ट्रेनिंग कमांड तसेच अनुभवी चाचणी चमू देखील उपस्थित होते.  एएफटीपीएसच्या ऑफिसर कमांडिंग यांनी या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा आढावा आणि अभ्यासक्रमाचा अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात भारताची तिन्ही सैन्यदले, भारतीय तटरक्षक दल, एचएएल, डीआरडीओ आणि मित्रराष्ट्रांच्या अधिकाऱ्यांना फ्लाइट चाचणी प्रशिक्षण देण्यासाठी डी-फॅक्टो सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून संस्था बजावत असलेली महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यात आली. 

आपल्या समारोपाच्या भाषणात, सीडीएस जनरल चौहान यांनी कमांडंट एएसटीई आणि एएफटीपीएसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, या विशिष्ट क्षेत्रात प्रशिक्षणाचा उच्च दर्जा राखल्याबद्दल तसेच भारतीय वायुसेनेच्या क्षमता निर्माण आणि आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल  कौतुक केले. यामध्ये देशातील लष्करी विमान वाहतूक सेवेचे अद्यतनीकरणाचाही समावेश आहे.  त्यांनी पदवीधर अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, आणि देशसेवेसाठी आवश्यक सुसज्जतेसाठी गुणवत्ता आणि सुरक्षितेची मानके पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक सक्षमतेच्या महत्त्वावर भर दिला. प्रशिक्षणार्थी म्हणून विद्यार्जन करताना उत्कृष्ट व्यावसायिक क्षमता प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम घेत राहिल्याबद्दल सीडीएस चौहान यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

***

M.Pange/S.Mukhedkar/P.kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021610) Visitor Counter : 38