संरक्षण मंत्रालय

समुद्रावर पसरणाऱ्या तेल तवंगाच्या गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भारतीय तटरक्षक दलाकडून प्रदूषण प्रतिसाद चर्चासत्र आणि मॉक ड्रिलचे आयोजन

Posted On: 23 MAY 2024 5:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 मे 2024

 

भारतीय तटरक्षक दलाने (ICG) पश्चिम बंगालमध्ये हल्दीया येथील तटरक्षक दलाच्या जिल्हा क्रमांक 8 मुख्यालयात 22-23 मे 2024 रोजी एका प्रदूषण प्रतिसाद चर्चासत्राचे आणि मॉक ड्रिलचे आयोजन केले. समुद्रावर पसरणाऱ्या तेल तवंगाच्या अतिशय गंभीर समस्येला तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी, तेल तवंगाची हाताळणी करणाऱ्या संस्थांसह विविध संस्थांचे प्रमुख हितधारक यामध्ये सहभागी झाले होते.

या सहभागींनी प्रत्यक्ष मेजावरील चर्चेत सहभागी होताना प्रत्यक्ष आपत्तींच्या आभासी परिस्थितीची हाताळणी करताना आपल्या क्षमतांमध्ये वाढ करण्यासाठी आणि या सरावामध्ये सहभागी झालेल्या सर्वांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी प्रदूषण प्रतिसादकारक अत्याधुनिक सामग्रीच्या उपयुक्ततेचे सादरीकरण करण्यात आले ज्यामुळे अशा पर्यावरणविषयक आपत्तींना तोंड देण्यासाठी आपल्या सज्जतेमध्ये सुधारणा करण्याचा वास्तविक अनुभव सहभागींना घेता आला.  

तटरक्षक दलाच्या जिल्हा क्रमांक 8 मुख्यालयाच्या प्रमुखांनी ताळमेळ आणि राष्ट्रीय तेल तवंग आपत्ती आकस्मिकता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. सागरी संसाधनांचे संरक्षण करण्याची सामूहिक जबाबदारी त्यांनी अधोरेखित केली आणि सुरक्षित समुद्र आणि स्वच्छ किनारपट्ट्यांविषयीच्या तटरक्षक दलाच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

 

* * *

S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021404) Visitor Counter : 61