उपराष्ट्रपती कार्यालय

डॉ. कमला बेनिवाल यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला


डॉ. कमला बेनिवाल या महिला सक्षमीकरणाचा वस्तुपाठ होत्या : उपराष्ट्रपती

Posted On: 15 MAY 2024 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2024

त्रिपुरा,गुजरात आणि मिझोरामच्या माजी राज्यपाल आणि राजस्थानच्या माजी उपमुख्यमंत्री डॉ.कमला बेनिवाल यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शोक व्यक्त केला आहे.

उपराष्ट्रपतींनी X समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, एक कुशल प्रशासक आणि महिला सक्षमीकरणाचा वस्तुपाठ म्हणून डॉ. कमला बेनिवाल यांचा वारसा उल्लेखनीय आहे. साधेपणा आणि खंबीरपणा यामुळे त्यांना अनेक प्रशंसक लाभले, त्यांनी नमूद केले आहे.

डॉ.कमला बेनिवाल यांच्याबरोबर पाच दशकांहून अधिक काळ असलेल्या आपल्या प्रदीर्घ  परिचयाचे स्मरण करून, त्यांच्या निधनाने आपली मोठी हानी झाल्याचे उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे, आणि डॉ. कमला बेनिवाल यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि चाहत्यांप्रती त्यांनी सहसंवेदना व्यक्त केली आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020709) Visitor Counter : 64


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu