संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचे जहाज किल्तानची व्हिएतनामच्या कॅम रान्ह बे ला भेट
Posted On:
12 MAY 2024 7:19PM by PIB Mumbai
आयएनएस किल्तानचे 12 मे 24 रोजी व्हिएतनाममधील कॅम रान्ह बे येथे आगमन झाले आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही आणि भारतीय दूतावासाने त्याचे अगत्यपूर्वक स्वागत केले. ही भेट भारतीय नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्याच्या परिचालनात्मक तैनातीचा एक भाग आहे. या भेटीमुळे दोन्ही सागरी राष्ट्रांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य अधिक दृढ होईल.
भारत आणि व्हिएतनाममध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आहे. हे संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने भारतीय नौदल जहाज किल्तानची भेट व्यावसायिक संवाद, क्रीडा, सामाजिक देवाणघेवाण आणि दोन्ही नौदलांची सामायिक मूल्ये प्रतिबिंबित करणारे सामाजिक संपर्क या कार्यांवर केंद्रित आहे. भारतीय नौदल आणि व्हिएतनाम पीपल्स नेव्ही यांच्यात समुद्रातल्या सागरी भागीदारी प्रात्यक्षिकाने या भेटीची सांगता होईल. या प्रात्यक्षिकामुळे आंतर क्रियान्वयन आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण वाढेल.
आयएनएस किल्तान हे एक स्वदेशी पाणबुडीविरोधी संरक्षक युद्धनौका असून याची रचना भारतीय नौदलाच्या नौदल संचालनालयाने केली आहे आणि बांधणी कोलकात्याच्या गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (GRSE) यांनी केली आहे. आयएनएस किल्तान हे चार P28 युद्धजन्य पाणबुडीविरोधी (ASW) युद्धनौकांच्या श्रेणीतले तिसरे जहाज आहे.
EEGI.jpg)
VD8Q.jpg)
***
S.Kane/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2020392)
Visitor Counter : 105