खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राज्य खाणकाम निर्देशांकाबाबत खाणी मंत्रालयाने चर्चेअंती कामगिरीचे निर्देशांक निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत 26 राज्यांचा सहभाग

Posted On: 08 MAY 2024 5:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मे 2024

खाणी मंत्रालयाने धनबाद इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था – भारतीय खाणी शाळा (आयआयटी-आयएसएम) च्या सहयोगाने नवी दिल्ली इथे आज राज्य खाणकाम निर्देशांकाबाबत एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले. खाण उद्योग क्षेत्रातील सर्व भागीदारांसाठी राज्यामध्ये खाणकाम व्यवसाय करण्यातील सुलभतेसंदर्भातील सर्व घटकांविषयी समजून घेण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरेल.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी खाणी मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांता राव होते. खाण क्षेत्राच्या विकासासाठी राज्यांच्या प्रयत्नांचे महत्त्व या संदर्भातील धोरणात योग्यरित्या प्रतिबिंबीत झाल्याकडे राव यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले. राज्य खाणकाम निर्देशांकाची गरज अधोरेखित करून त्यामुळे राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि सहकारी संघभावनेला प्रोत्साहनही देता येईल, असे ते म्हणाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यांचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगून राज्यांनी वेळच्या वेळी सांख्यिकी परतावा भरून या विषयी माहिती गोळा करण्याच्या कामी मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली.

या कार्यशाळेच्या निमित्ताने केंद्र आणि राज्य सरकारांमधील धोरणकर्ते, व्यवस्थापक आणि खाणकाम व्यावसायिक एकत्र आले होते. कामगिरीचे निर्देशांक व उप-निर्देशांक, त्यासाठीची चौकट आणि कार्यपद्धती ठरवण्यासाठी कार्यशाळेत झालेल्या चर्चेत 26 राज्यांमधील मुख्य सचिव, संचालक आणि इतर अधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला. सल्लामसलत आणि राज्यांकडून अभिप्राय आल्यानंतर राज्य खाणकाम निर्देशाकॉसाठीचीी चौकट निश्चित करण्यात येणार असून जुलै 2024 मध्ये ती जाहीर करण्यात येईल. त्यावर आधारित क्रमवारी एप्रिल 2025 प्रत्यक्षात येईल.

S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2019989) Visitor Counter : 81