शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उच्च शिक्षण विभाग सचिव के. संजय मूर्ती यांनी रचना आणि उद्योजकता (सीबीडीई) यांवर आधारित क्षमता निर्मिती कार्यक्रमाची केली सुरुवात

Posted On: 07 MAY 2024 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 मे 2024

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे सचिव के. संजय मूर्ती यांनी आज, आभासी पद्धतीने ‘रचना आणि उद्योजकता (सीबीडीई) यांवर आधारित क्षमता निर्मिती’ कार्यक्रमाची सुरुवात केली.याप्रसंगी, विभागातील अधिकारी; सीबीडीईचे कार्यक्रम सल्लागार मंडळाचे सदस्य; उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक; निवडलेल्या उच्च शिक्षण संस्थांचे (एचईआयएस) प्रतिनिधी, सीबीडीईचे कार्यक्रम संचालक प्रा.सुधीर वरदराजन यांच्यासह प्रधान परीक्षक आणि सह-प्रधान परीक्षक उपस्थित होते. सुमारे 130 हून अधिक व्यक्ती आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाल्या.

के.संजय मूर्ती यांनी त्यांच्या भाषणात सदर कार्यक्रम उद्योगक्षेत्र आणि शिक्षण क्षेत्र यांच्यातील सहयोगी संबंधाद्वारे संचालित केला जाईल यावर अधिक भर दिला. उद्योग- शिक्षणक्षेत्र यांच्यातील संबंधांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून उद्योगक्षेत्रातील तज्ञ मंडळी एचईआयएसना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत देखील देत आहेत याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी ज्या प्रक्रियेद्वारे 30 उच्च शिक्षण संस्थांची हा कार्यक्रम राबवण्यासाठी निवड झाली त्या  कार्यक्रमातील सहभागासाठी संरचित कठोर निवड प्रक्रियेची माहिती दिली.

निवडण्यात आलेल्या एचआयईएस आणि त्यांतील शिक्षक वर्गाने उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शकांच्या पाठबळासह आपापल्या संस्थेमध्ये ‘रचना आणि उद्योजकता विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुसज्ज असावे यादृष्टीने क्षमता निर्मिती कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे. या टप्प्यावर कांचीपुरम येथील आयआयआयटीडीएमतर्फे संचालित प्रक्रियेच्या माध्यमातून 30 एचईआयएसची निवड करण्यात आली असून,या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी नोडल केंद्र म्हणून मालवीय अभियान शिक्षक प्रशिक्षण केंद्राची (एमएमटीटीसी) नेमणूक करण्यात आली आहे. जटील आव्हानांवर सर्जनशील आणि अभिनव उपाय शोधण्यास प्रोत्साहन देणारा आणि त्यातून शेवटी उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शकांनी टप्प्याटप्प्याने पुरवलेल्या सहयोगी मदतीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांच्या कल्पनांमध्ये वाढ करण्यासाठी ठोस पावले उचलणारा समस्या सोडवणूक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यावर या कार्यक्रमामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना एकास एक पद्धतीने शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच तज्ञ मार्गदर्शकांच्या गटातर्फे शिक्षक, विद्यार्थ्यांचे संघ आणि एचईआय भागीदारांमध्ये उत्पादकक्षम संवादाला प्रोत्साहन यांचा समावेश असेल. उद्योगजगताच्या रचनेतील वर्षानुवर्षांच्या सहभागातून मिळवलेल्या विशेष ज्ञानापासून शिकण्याच्या उद्देशाने निवड झालेल्या एचईआयएसना मार्गदर्शकांचे पाठबळ पुरवण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये सीबीडीईच्या कार्यक्रम सल्लागार मंडळाचे अध्यक्ष मनोज कोहली तसेच एनएएसएससीओएम संस्थेच्या अध्यक्ष देबजानी घोष यांच्यासारख्या उद्योग क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी या कार्यक्रमाच्या उत्तम परिणामांबाबत आशा व्यक्त केली.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019941) Visitor Counter : 63


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu