ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरईसी लिमिटेडने आतापर्यंतचा सर्वाधिक वार्षिक निव्वळ नफा नोंदवत आर्थिक निकाल केला जाहीर

Posted On: 30 APR 2024 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2024

 

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील महारत्न उपक्रम तसेच ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी अग्रगण्य गैर बॅकिंग वित्तीय कंपनी  असलेल्या आरईसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने , 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापरीक्षित स्टँडअलोन तसेच एकत्रित आर्थिक निकालांना आज (30 एप्रिल, 2024) मान्यता दिली.

मालमत्तेची गुणवत्ता सुधारणे आणि अनुत्पादित मालमत्तेचे प्रभावी निराकरण तसेच कर्जाचे दर पुनर्रचित करणे आणि वित्त खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे, आरईसी लिमिटेड 14,019 कोटी रुपये कर भरल्यानंतरही  सर्वाधिक वार्षिक नफा नोंदविण्यात सक्षम ठरली आहे.  परिणामी, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रति समभाग कमाई (EPS) 31 मार्च 2023 रोजी  41.85 रुपये प्रति समभागाच्या  तुलनेत 27% ने वाढून 53.11 रुपये प्रति समभाग झाली आहे.

नफ्यातील वाढीमुळे, 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या  निव्वळ संपत्तीमध्ये वार्षिकी आधारे  19% वाढ होऊन ती 68,783 कोटी रुपये झाली आहे.

आपल्या भागधारकांना लाभ देण्याची परंपरा पुढे चालू ठेवत, कंपनीच्या संचालक मंडळाने 5 रुपये प्रति समभाग (प्रत्येकी 10/- रुपयांच्या दर्शनी मूल्यावर) अंतिम लाभांश आणि आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकूण लाभांश 16 रुपये प्रति समभाग घोषित केला आहे. 

 

* * *

S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019191) Visitor Counter : 65