संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कझाकस्तान येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या संकल्पनेला समर्थन

Posted On: 26 APR 2024 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2024

कझाकस्तानमधल्या अस्ताना येथे 26 एप्रिल 2024 रोजी आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी भाग घेतला. या बैठकीत शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी मसुद्यावर स्वाक्षरी केली.बैठकीनंतर संयुक्त पत्रक प्रसिद्ध करण्यात आले.'वसुधैव कुटुंबकम' च्या  प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानातून उगम पावलेल्या  'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' ही कल्पना विकसित करण्यासाठी इतर उपक्रमांसह सदस्य देशांच्या संरक्षणमंत्र्यांनी सहमती दर्शवल्याचे या पत्रकाद्वारे सांगण्यात आले.

शांघाय सहकार्य संघटना क्षेत्रात शांतता,स्थैर्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी भारताच्या दृढ प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार या बैठकीत संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी केला.सदस्य देशांच्या समृद्धी आणि विकासासाठी, कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवाद जराही खपवून न घेण्याचा  दृष्टिकोन अवलंबण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.संयुक्त राष्ट्रांमध्ये, आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक करारावरील भारताच्या दीर्घकाळापासूनच्या प्रस्तावाचा उल्लेख अरमाने यांनी केला. हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी 'क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि प्रगती'(सागर) ही भारताची संकल्पनाही त्यांनी अधोरेखित केली.

N.Chitale/S.Kakade/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2018948) Visitor Counter : 177