कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

राष्ट्रकुल सार्वजनिक सेवा सचिवांच्या/ कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत फलनिष्पत्ती निवेदनात भारताच्या केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS)ची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणून प्रशंसा

Posted On: 25 APR 2024 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2024

 

राष्ट्रकुल सचिवालयाने भारताच्या केंद्रीय  सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) ची सर्वोत्कृष्ट पद्धत म्हणून प्रशंसा केली आहे. लंडनमध्ये मार्लबरो येथे 22 ते 24 एप्रिल 2024 दरम्यान झालेल्या राष्ट्रकुल सार्वजनिक सेवा सचिवांच्या/ कॅबिनेट सचिवांच्या बैठकीत CPGRAMS ची प्रशंसा झाली. सर्व राष्ट्रकुल सदस्यांच्या लोकसेवाप्रमुखांच्या तिसऱ्या द्वैवार्षिक बैठकीतजारी केलेल्या फलनिष्पत्ती  निवेदनात राष्ट्रकुल सचिवालयाने सर्व सदस्य राष्ट्रांपैकी काही निवडक सर्वोत्तम कार्यपद्धतींची माहिती सदस्यांना दिली. यामध्ये भारताच्या CPGRAMS चा, नामिबियाच्या नागरी नोंदणी तथा महत्त्वपूर्ण संख्याशास्त्र प्रणाली (CVRS) चा व परिचय व्यवस्थापन प्रणालीचा आणि केनियाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन आणि ई-नागरिक प्रतिमानांचा समावेश होता. भविष्यात होणारे बदल लक्षात घेऊन सुशासनासाठी सिद्ध असलेल्या सर्वोत्तम पद्धती म्हणून यांची गणना करण्यात आली.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही.श्रीनिवास यांनी 23  एप्रिल 2024 रोजी CPGRAMS विषयी भारताकडून सादरीकरण केले होते. जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट कार्यपद्धती म्हणून राष्ट्रकुल सदस्य देशांनी CPGRAMS ला नावाजले होते.

सेवांच्या सर्वोत्तम व्यवहार्य वितरणाच्या दृष्टीने ई-सेवा पुरवण्यासाठी आणि राष्ट्रकुलाच्या सर्व सदस्य देशांमध्ये शाश्वत विकासाचा 2030 चा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तंत्रज्ञानाची कशी मदत घेता येईल यावर   

समकालीन ज्ञानाचे, कल्पनांचे तसेच अनुभवांचे आदानप्रदान करण्याच्या प्राथमिक उद्देशाने ही बैठक घेण्यात आली होती.

न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तंत्रज्ञानाचा प्रभाव सदस्य राष्ट्रांनी मान्य केला.

तांत्रिक सहकार्यासाठी शाश्वत निधीपुरवठ्याचे महत्त्व- या विषयावरील एक अहवालही बैठकीसमोर ठेवण्यात आला.

या बैठकीत पुढील कृतिक्रमावर एकमत आणि शिक्कामोर्तब झाले :

  1. ज्ञान आणि अनुभवांचे आदानप्रदान वाढवण्यासाठी राष्ट्रकुल लोकसेवा प्रमुखांसाठी एका कृतीसमुदायाची स्थापना करणे. द्वैवार्षिक बैठकांच्या दरम्यानच्या काळात सुशासन विषयावर आधारित संवाद सतत राखला जाण्याच्या संधीचे सर्व मान्यवरांनी स्वागत केले.
  2. राष्ट्रकुल देशांमध्ये स्मार्ट सुशासनाचा आढावा घेऊन  त्यातील यशोगाथा व त्रुटी/ डिजिटल सेवांची मागणी याची नोंद घेणे
  3. ठरलेल्या कृतींची अंमलबजावणी देशपातळीवर करण्यासाठी एक आराखडा तयार करणे.
  4. राष्ट्रकुल कृत्रिम बुद्धिमत्ता महासंघाने केलेल्या कार्याची सदस्यांना माहिती देणे आणि त्याच्या उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क साधता येणाऱ्या सदस्य देशांची संख्या वाढवणे.
  5. राष्ट्रकुलाच्या सर्व सदस्य देशांमधून भविष्यासाठी सिद्ध असणाऱ्या सुशासनाच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचे आदानप्रदान घडवून आणणे. जसे- भारताची CPGRAMS, नामिबियाच्या नागरी नोंदणी तथा महत्त्वपूर्ण संख्याशास्त्र प्रणाली (CVRS) व परिचय व्यवस्थापन प्रणाली, आणि केनियाची मनुष्यबळ व्यवस्थापन व ई-नागरिक प्रतिमाने आणि अन्य काही पद्धती या बैठकीत सर्वांसमोर मांडल्या गेल्या.
  6. जीएपीपी तत्त्वांच्या अंमलबजावणीस पाठबळ देणारे तांत्रिक सहाय्य देत राहणे. यामध्ये सरकारच्या कामगिरीचे व्यवस्थापन करण्याच्या क्षेत्रातील क्षमता-उभारणीचाही समावेश होतो.

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018854) Visitor Counter : 41


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu