उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 26 एप्रिल 2024 रोजी तिरुपती आणि हैदराबाद भेटीवर
प्रविष्टि तिथि:
24 APR 2024 6:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2024
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 26 एप्रिल 2024 रोजी आंध्र प्रदेशात तिरुपती आणि तेलंगणातील हैदराबादला भेट देणार आहेत.
उपराष्ट्रपती तिरुमला, तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना करून आणि दर्शन घेऊन आंध्र प्रदेश दौऱ्याचा आरंभ करतील. तिरुपती येथील राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणूनही ते उपस्थित राहणार आहेत.
एक दिवसाच्या या दौऱ्यादरम्यान, उपराष्ट्रपती तेलंगणातील हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधेला भेट देणार आहेत.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2018754)
आगंतुक पटल : 142