कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचे लंडन येथील राष्ट्रकुल देशांच्या सार्वजनिक सेवा/सचिवालय प्रमुखांच्या तिसऱ्या द्वैवार्षिक कॅबिनेट बैठकीत केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) वरील सादरीकरण

Posted On: 24 APR 2024 3:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2024

स्मार्ट (SMART) प्रशासनासाठी अत्याधुनिक तक्रार निवारण प्रणाली म्हणून राष्ट्रकुल सचिवालयाने CPGRAMS ची दखल घेतली असून, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाला (DARPG) 22 ते 24 एप्रिल 2024 या कालावधीत मार्लबरो हाऊस, लंडन येथे होणाऱ्या राष्ट्रकुल देशांच्या सार्वजनिक सेवा/सचिवालय प्रमुखांच्या तिसऱ्या द्वैवार्षिक कॅबिनेट बैठकीत सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले आहे. "सेवा वितरण सुधारण्यासाठी स्मार्ट सरकारचे संस्थात्मकीकरण" , ही या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना असून, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अंगीकारण्यावर भर दिला जाईल. या बैठकीमध्ये राष्ट्रकुल देशांमधील  जवळजवळ 50 सदस्य देश सहभागी होत आहेत.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (DARPG) सचिव व्ही. श्रीनिवास यांनी 23 एप्रिल 2024 रोजी, केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) वरील भारताचे सादरीकरण केले, ज्याची जगातील सर्वोत्तम पद्धती म्हणून राष्ट्रकुल सदस्य देशांनी प्रशंसा केली. राष्ट्रकुलच्या सरचिटणीस पॅट्रिशिया स्कॉटलंड के.सी म्हणाल्या, "CPGRAMS ही एक अत्याधुनिक तक्रार निवारण प्रणाली असून, स्मार्ट सरकारची सर्वोत्तम पद्धती आहे.या तंत्रज्ञान व्यासपीठाचा अवलंब केल्यामुळे भारतातील 1.4 अब्ज नागरिकांचा फायदा झाला असून, राष्ट्रकुलच्या उर्वरित 1.2 अब्ज नागरिकांनाही त्याचा लाभ मिळेल."

सदस्य देशांनी आपल्या देशासाठी प्रभावी तक्रार निवारण प्रणाली कशी काल सुसंगत आहे, याचा अनुभव घेतला.

या तीन दिवसीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाचे (DARPG) सचिव व्ही. श्रीनिवास आणि राष्ट्रकुल सचिवालयाच्या सरचिटणीस पॅट्रिशिया स्कॉटलंड के.सी यांची सौहार्दपूर्ण आणि फलदायी बैठक आयोजित करण्यात आली होती.  

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाच्या (DARPG) सादरीकरणाचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे:

  1. नागरिक आणि प्रशासन यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी, नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी तंत्रज्ञानाची क्षमता ओळखणे.
  2. केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीच्या (CPGRAMS) 10-टप्प्यांमधील सुधारणांच्या अंमलबजावणीमुळे तक्रार निवारणाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली असून, तक्रार निवारणासाठी लागणारा वेळ कमी झाला आहे.
  3. भारताने प्रति महिना 1.5 लाख तक्रारींचा निपटारा करण्यात यश मिळवले असून, CPGRAMS पोर्टलवर 1.02 लाख तक्रार अधिकारी नियुक्त केले आहेत.
  4. सरकारने CPGRAMS 8.0 अंतर्गत रु. 128 कोटी निधी मंजूर केला असून, या अंतर्गत पुढील दोन वर्षांमध्ये सुधारित तंत्रज्ञान व्यासपीठ उपलब्ध केले जाईल.

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2018721) Visitor Counter : 40