संरक्षण मंत्रालय

डीआरडीओ ने तेजस Mk1A या हलक्या लढाऊ विमानासाठी स्वदेशी अत्याधुनिक ऍक्च्युएटर्स आणि एअरब्रेक नियंत्रित मॉड्यूलची पहिली खेप एचएएल कडे केली सुपूर्द

Posted On: 19 APR 2024 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2024

 

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने स्वदेशी अत्याधुनिक ॲक्ट्युएटर्स आणि एअरब्रेक नियंत्रित मॉड्यूलची पहिली खेप हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडे सुपूर्द केली आहे. या यशामुळे देशाने विमान उड्डाण  तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्णतेच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. लखनौ स्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने सध्याच्या 83 LCA तेजस Mk1A साठी या सामग्रीच्या उत्पादनाची  तयारी आधीच सुरु केली आहे.

तेजसच्या दुय्यम फ्लाइट कंट्रोलमध्ये अत्याधुनिक स्लॅट्स आणि एअरब्रेक्सचा समावेश आहे, आणि आता त्यात अत्याधुनिक सर्वो-व्हॉल्व्ह आधारित इलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो ॲक्ट्युएटर आणि कंट्रोल मॉड्यूल्सचा समावेश करण्यात आला आहे.  वैशिष्ट्यपूर्ण रचना, अचूक उत्पादन, संरचना आणि चाचण्या ही  वैशिष्ट्ये असलेले हे उच्च दाबाचे  रिडंडंट सर्वो ॲक्ट्युएटर्स आणि नियंत्रण मॉड्यूल म्हणजे एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीच्या स्वदेशी तांत्रिक कौशल्य विकासासाठीच्या अथक प्रयत्नाची फलनिष्पत्ती आहे.

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीने रिसर्च सेंटर इमारत (RCI), हैदराबाद आणि केंद्रीय उत्पादन तंत्रज्ञान संस्था (CMTI), बेंगळुरू यांच्या सहयोगाने या तंत्रज्ञानामध्ये स्वयंपूर्ण बनण्याची  योजना आखली आहे. अत्याधुनिक ॲक्ट्युएटर्स आणि एअरब्रेक नियंत्रित मॉड्युल्ससाठी आवश्यक असलेल्या फ्लाइट ट्रायल यशस्वीपणे पूर्ण केल्याने या सामग्रीच्या उत्पादन मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून यामुळे  तेजसच्या Mk-1A श्रेणीला सुसज्ज करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड सज्ज झाले  आहे.

या महत्त्वपूर्ण घटकांचे उत्पादन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, लखनौ च्या ॲक्सेसरीज विभागात सुरू असून हे भारताच्या एरोस्पेस उत्पादन क्षमतांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.  CEMILAC आणि DGAQA सारख्या प्रमाणन संस्थांसह मुंबईतील गोदरेज एरोस्पेस या कंपनीसह सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांचे उल्लेखनीय योगदान या प्रयत्नात अत्यंत मोलाचे ठरले आहे.

हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल संरक्षण विभागाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष आणि एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक यांनी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, RCI, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड , CMTI आणि सर्व सहभागी उद्योगांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018291) Visitor Counter : 56


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil