राष्ट्रपती कार्यालय

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा शुभेच्छासंदेश

Posted On: 13 APR 2024 5:41PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला नागरिक बंधुभगिनींना उद्देशून शुभेच्छासंदेश दिला आहे.

आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणतात, "आपल्या संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या सर्वात प्रभावी राष्ट्रनिर्मात्यांपैकी एक असणाऱ्या- डॉ.बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी नागरिक बंधुभगिनींना सप्रेम शुभेच्छा देत आहे.

अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे बाबासाहेब सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते होते. न्यायवेत्ते, शिक्षणतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते असे बहुपेडी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या डॉ.आंबेडकर यांनी आपल्या देशाप्रति आणि समाजाप्रति उत्तुंग योगदान दिले. आजही संविधानात्मक व्यवस्थेवरील त्यांचा भक्कम विश्वास हाच आपल्या लोकशाहीचा आणि सुशासनाचा पाया आहे. डॉ.आंबेडकर यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समताधिष्ठित समाजाच्या प्रतिष्ठापनेसाठी समर्पित केले आणि पददलितांच्या उद्धारासाठी सतत संघर्ष केला.

त्यांच्या जयंतीनिमित्त, डॉ.आंबेडकर यांच्या आदर्शांचा आपण अंगीकार करूया आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी सामूहिक प्रयत्न करूया."

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा. -:

***

S.Patil/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017866) Visitor Counter : 66