राष्ट्रपती कार्यालय

बैसाखी , विशू, बिशुबा , बोहाग बिहू, पोइला बोईशाख , वैशाखादी आणि पुतांदूच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

Posted On: 12 APR 2024 7:26PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 13 आणि 14 एप्रिल 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या बैसाखी , विशू, बिशुबा , बोहाग बिहू, पोइला बोईशाख , वैशाखादी आणि पुतांदूच्या पूर्वसंध्येला दिलेल्या संदेशात म्हटले आहे:-

बैसाखी , विशू, बिशुबा , बोहाग बिहू, पोइला बोईशाख , वैशाखादी आणि पुतांदूच्या पावन प्रसंगीभारत आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि अभिष्टचिंतन करते.

भारताच्या विविध भागात साजरे केले जाणारे हे सण आपल्या वैविध्यपूर्ण  सांस्कृतिक वारशाची जिवंत अभिव्यक्ती आहेत. हे सण एकता, सौहार्द आणि बंधुभाव वाढवतात. हे सर्व सण सामाजिक समरसतेचे प्रतीक म्हणून आपल्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण करतात. या सणांच्या माध्यमातून आपण आपल्या अन्नदाताशेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करतो आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

हे सण सर्वांच्या जीवनात समृद्धी आणि शांती घेऊन येवोत.

राष्ट्रपतींचा संदेश पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा-

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2017808) Visitor Counter : 63