दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
“डिजिटल दूरसंवाद क्षेत्रातील नियामकीय सँडबॉक्सच्या माध्यमातून अभिनव तंत्रज्ञान, सेवा, यूज केसेस आणि बिझनेस मॉडेल्सना प्रोत्साहन” याबाबत ट्राय ने जारी केल्या शिफारशी
Posted On:
12 APR 2024 4:52PM by PIB Mumbai
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज "डिजिटल दूरसंवाद क्षेत्रातील नियामकीय सँडबॉक्सद्वारे अभिनव तंत्रज्ञान, सेवा, यूज केसेस आणि बिझनेस मॉडेल्सना प्रोत्साहन" या विषयावर आपल्या शिफारशी जारी केल्या आहेत. 5G/6G, मशिन टू मशिन संपर्क, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज (इंटरनेट जोडणी), व्हर्च्युअल रिॲलिटी आणि इतर गोष्टीतील नवीन तंत्रज्ञानाचा विकास लक्षात घेता, नवीन तंत्रज्ञान, सेवा, यूज केसेस आणि बिझनेस मॉडेल्स यांची थेट नेटवर्कमध्ये चाचणी करता येणाऱ्या किंवा विद्यमान कार्ये किंवा प्रक्रिया करता येतील अशी परिसंस्था तयार करण्याची गरज आहे. या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, दूरसंचार विभागाने 10 मार्च 2023 रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाला पत्र लिहून, डिजिटल दूरसंवाद उद्योगातील नवीन सेवा, तंत्रज्ञान आणि बिझनेस मॉडेल्ससाठी नियामकीय सँडबॉक्स चौकटीकरिता ट्राय च्या शिफारसींची विनंती केली.
नियामकीय सँडबॉक्स (आरएस) दूरसंचार नेटवर्क आणि ग्राहक संसाधनांमध्ये रिअल-टाइम परंतु नियंत्रित प्रवेश देते, जो प्रयोगशाळेतील चाचणी किंवा प्रायोगिक तत्त्वावरील पारंपरिक पद्धतींमध्ये शक्य नाही. अनेक देशांतील नियामक संस्थांनी अशा सँडबॉक्स फ्रेमवर्कची स्थापना केली आहे. भारतात थेट चाचणीसाठी अशी चौकट प्रदान केल्याने अधिकाधिक उद्योजकांना देशाच्या तसेच जगाच्या डिजिटल दूरसंवाद उद्योगासाठी उपाय विकसित करण्यास प्रोत्साहन मिळेल.
दूरसंचार विभागाने 11.03.2024 रोजी 'स्पेक्ट्रम रेग्युलेटरी सँडबॉक्स' (एसआरएस) किंवा 'WiTe Zones (वायरलेस टेस्ट झोन)' स्थापन आणि कार्यान्वित करण्याकरिता तसेच संशोधन आणि विकास उपक्रम आणि उदयोन्मुख नवीन रेडिओ संप्रेषण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात बाह्य चाचणी/प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत.
या शिफारशी सर्व संबंधित घटकांची तपशीलवार रूपरेषा देतात आणि डिजिटल दूरसंवाद क्षेत्रात सँडबॉक्स चाचणी आयोजित करण्यासाठी सर्वसमावेशक चौकट प्रदान करतात. शिफारशींचा भाग म्हणून, प्राधिकरणाने आरएस आराखड्याचे उद्दिष्ट आणि मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
नियामकीय आराखड्यात संपूर्ण आरएस प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी स्पष्ट दस्तावेजाची आवश्यकता आणि अर्ज, मूल्यमापन आणि मंजूरी प्रक्रिया समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, नियामकीय सँडबॉक्स चाचणीच्या प्रगती आणि परिणामांचे प्रभावीपणे निरीक्षण करण्यासाठी तपशीलवार अहवाल यंत्रणा परिभाषित केली गेली आहे. या आराखड्यानुसार आरएस अंतर्गत दिलेली परवानगी त्याच्या उत्पादनाच्या चाचणीसाठी 12 महिन्यांपर्यंत वैध असेल.
शिफारस केलेल्या रेग्युलेटरी सँडबॉक्स फ्रेमवर्कने डिजिटल दूरसंवाद उद्योगाच्या स्टार्टअप परिसंस्थेला रिअल नेटवर्क वातावरण आणि दूरसंचार नेटवर्कच्या इतर डेटामध्ये नवीन ऍप्लिकेशन्स बाजारात आणण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता तपासण्यात मदत करणे अपेक्षित आहे.
ट्रायच्या www.trai.gov.in या संकेतस्थळावर या शिफारसी उपलब्ध आहेत. कोणत्याही स्पष्टीकरण/माहितीसाठी, संजीव कुमार शर्मा, सल्लागार (ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण), ट्राय यांच्याशी +91-11-23236119 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.
***
S.Kane/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017779)
Visitor Counter : 81