राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 10 APR 2024 7:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2024

 

ईद-उल-फित्रच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती म्हणतात, “ईद-उल-फित्रच्या शुभ प्रसंगी भारतात तसेच परदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्व नागरिकांना, विशेषतः मुसलमान बंधू-भगिनींना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.

हा सण रमझानच्या पवित्र महिन्यातील उपवास तसेच प्रार्थनेच्या समाप्तीनिमित्त साजरा केला जातो . तसेच हा सण आपल्याला शांती आणि बंधुत्वाचा संदेश देतो. हा उत्सव एकता , क्षमाशीलता आणि दानधर्माची शिकवण  देतो. गरीब आणि वंचित लोकांना मदत करून आपला आनंद त्यांच्यासमवेत सामायिक करण्याचा हा उत्सव आहे. हा सण आपल्याला शांततामय जीवन जगण्याची तसेच समाजाच्या भरभराटीसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देतो.

ईद-उल-फित्रच्या पवित्र पर्वानिमित्त  आपण प्रेम, करुणा  आणि परोपकाराच्या आदर्शांचा सर्वत्र प्रसार करूया.”

राष्ट्रपतींचा संपूर्ण संदेश मिळवण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2017643) आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil