प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेअंतर्गत इ-वाहनांच्या बॅटरींचा पुनर्वापराबाबत स्टार्ट अप्समध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी युरोपीय महासंघ आणि भारताने केली हातमिळवणी

Posted On: 09 APR 2024 7:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2024

युरोपीय महासंघ आणि भारत यांनी आज एका उचितशोध (मॅचमेकिंग) कार्यक्रमात, विद्युतचालित वाहनांच्या बॅटरींचा पुनर्वापर करण्याच्या क्षेत्रात कार्यरत स्टार्ट अपसाठी एक स्वारस्य अभिव्यक्ती जारी केली. युरोपीय आणि भारतीय लघु तथा मध्यम उद्योगांमध्ये तसेच स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट अपमध्ये सहकार्य वाढवणे हा मॅचमेकिंग कार्यक्रमाचा उद्देश आहे. दुर्मिळ द्रव्यपदार्थांचे चक्रीकरण करण्यास चालना देण्यासाठी आणि भारतात तसेच ईयू प्रदेशात कार्बन औदासीन्याकडे (न्यूट्रालिटी) वाटचाल करण्यासाठी ज्ञान आणि कौशल्य यांचे उद्देशित आदानप्रदान महत्त्वपूर्ण ठरेल. भारत -युरोपीय महासंघ व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेअंतर्गत हा उपक्रम प्रत्यक्षात येणार आहे. 25 एप्रिल 2022 रोजी भारत आणि युरोपीय आयोगाने नवी दिल्ली येथे याची घोषणा केली होती.

हा कार्यक्रम म्हणजे शाश्वत कृतीक्रमास चालना देण्याच्या, नवोन्मेषाचा परिपोष करण्याच्या आणि भारत व युरोपीय महासंघ दरम्यान अधिक बळकट आर्थिक नाते निर्माण करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.

आज सुरू केलेल्या मॅचमेकिंग कार्यक्रमातील स्वारस्य अभिव्यक्तीद्वारे, ईव्ही बॅटरी रिसायकल तंत्रज्ञान क्षेत्रातील भारताच्या आणि युरोपीय महासंघाच्या स्टार्ट अप/एसएमई उद्योगांना, त्यांनी शोधलेले अभिनव उपाय  जगासमोर ठामपणे मांडण्यासाठी व भारतातील/ईयूमधील साहसी भांडवलदारांशी साहचर्य वाढवण्यासाठी एक व्यासपीठ मिळेल. भारतातील व युरोपीय महासंघामधील प्रत्येकी सहा असे बारा नवोन्मेषी उद्योजक निवडले जाऊन त्यांना जून2024 मधील अशा मॅचमेकिंग कार्यक्रमात मांडणीसाठी संधी दिली जाईल. या सादरीकरणाच्या आधारे अंतिम सहा (भारत तीन, ईयू तीन) जणांची निवड होऊन त्यांना अनुक्रमे ईयूला/भारताला भेट देण्याची संधी दिली जाईल.

यात स्वारस्य असणाऱ्या भारतातील व युरोपीय महासंघामधील स्टार्ट अप आणि एमएसई उद्योगांनी 30 एप्रिल 2024 पर्यंत स्वारस्य अभिव्यक्ती (इओआय) भरायची आहे.

कार्यक्रम आणि अर्जप्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी, नवोन्मेषी उद्योजकांनी येथे भेट द्यावी -

https://www.psa.gov.in/india-eu-ttc#india-eu-ttc-eoi

https://www.eeas.europa.eu/delegations/india/eu-india-electrical-vehicle-battery-recycling-technologies-exchange-2024_en

 

 

S.Kane/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2017563) Visitor Counter : 74