उपराष्ट्रपती कार्यालय
उगादी, गुढी पाडवा, चैत्र शुक्लादी, चेट्टी चंद, नवरेह आणि साजिबू चेरोबा या सणांच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी नागरिकांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
08 APR 2024 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2024
उगादी, गुढीपाडवा, चेट्टी चंद, चैत्र शुक्लादी, नवरेह आणि साजिबू चेरोबा या पवित्र सणांच्या शुभ मुहूर्तावर मी सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये,वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जाणारा हा सण पारंपारिक नवीन वर्षाचा आरंभ आहे , मात्र हर्षोल्लास हाच त्याचा गाभा आहे आणि आशा, समृद्धी आणि नवोन्मेषाचे ते प्रतीक आहे. हा सण साजरा करत असताना,भारताची जडणघडण परिभाषित करणाऱ्या या विविधतेतील एकतेच्या भावनेला आपण दृढ करु या!
हे नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात समृद्धी आनंद आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.
उपराष्ट्रपतींच्या संदेशाचा हिंदी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे.
मैं सभी देशवासियों को चैत्र शुक्लादि, उगादि, गुड़ी पड़वा, चेती चांद, नवरेह और साजिबु चेरोबा के पावन अवसर पर हार्दिक बधाई और स्नेहिल शुभकामनाएं देता हूं।
विभिन्न नामों से मनाए जाने वाले किंतु अपने केंद्र में हर्षोल्लास को समाहित किए हुए ये सभी त्योहार हमारे विविधता संपन्न राष्ट्र के अलग-अलग कोनों में पारंपरिक रूप से नए साल के शुभारंभ के प्रतीक हैं। ये पर्व सकारात्मक ऊर्जा, नव-आशा, समृद्धि और नवीनता के परिचायक हैं।
आइए, प्रसन्नता का संदेश लिए इन उत्सवों बीच हम विविधता में एकता की उस भावना को सुदृढ़ करें जो भारत के बुनियादी ताने-बाने को परिभाषित करती है।
मेरी मंगलकामना है कि यह नव-वर्ष सभी के जीवन में समृद्धि, आनंद और आरोग्य लेकर आए।
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 2017460)
आगंतुक पटल : 157