ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकूण 15 गिगावॅट क्षमतेचे जलविद्युत प्रकल्प निर्माणाधीन

Posted On: 05 APR 2024 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2024

देशात एकूण 15 गिगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांचे काम सुरू आहे. जलविद्युत क्षमता सन 2031-32 पर्यंत 42 गिगावॅट वरून 67 गिगावॅट पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, जी सध्याच्या क्षमतेच्या निम्म्याहून अधिक वाढ दर्शवते.

भारतीय हवामान खात्याने चालू आर्थिक वर्षात जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, हिमालयीन प्रदेशात असलेल्या जलविद्युत प्रकल्पांना बर्फ वितळल्याने निर्माण झालेल्या पृष्ठभागावरून अधिक  प्रवाह मिळतो; त्यामुळे, तापमानात झालेली कोणतीही वाढ हिम वितळण्यास सहाय्यभूत ठरेल.

शिवाय, देशात चालू असलेली ऊर्जा संक्रमणे पाहता, उदंचन जलविद्युत प्रकल्पांचा (पीएसपी) विकास हा ग्रिडला अधिक भौतिक शक्ती  आणि समतोल ऊर्जा प्रदान करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. पीएसपी ला 'वॉटर बॅटरी' म्हणूनही ओळखले जाते, जी आधुनिक स्वच्छ ऊर्जा प्रणालींसाठी एक आदर्श पूरक व्यवस्था आहे.

सध्या, देशात 2.7 गिगावॅट एकूण क्षमतेच्या पीएसपी चे बांधकाम सुरू असून आणखी 50 गिगावॅट क्षमतेचे प्रकल्प विकासाच्या विविध टप्प्यांत आहेत. सन 2031-32 पर्यंत पीएसपी क्षमता 4.7 गिगावॅट वरून 55 गिगावॅट पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2017289) Visitor Counter : 104