आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

निवडींमध्ये स्पष्टता: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना त्यांच्या संकेतस्थळांवर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांचे  योग्य वर्गीकरण  करण्याची केली सूचना

Posted On: 02 APR 2024 5:22PM by PIB Mumbai

 

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने (एफएसएसएआय) सर्व  ई-कॉमर्स  फूड बिझनेस ऑपरेटर्सना त्यांच्या संकेतस्थळांवर विकल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांचे  योग्य वर्गीकरण  करण्याची  सूचना  केली आहे. एफएसएसएआयला असे आढळून आले आहे की  'प्रोप्रायटरी फूड' अंतर्गत परवाना असलेले त्याच श्रेणीच्या जवळपास असलेले खाद्यपदार्थ उदा.  डेअरी बेस्ड बेव्हरेज मिक्स किंवा सीरियल (तृणधान्य ) बेस्ड बेव्हरेज मिक्स किंवा माल्ट बेस्ड बेव्हरेज हे, 'हेल्थ ड्रिंक', 'एनर्जी ड्रिंक' या श्रेणी अंतर्गत  ई-कॉमर्स संकेतस्थळावर  विकले जात आहेत.

एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे की 'हेल्थ ड्रिंक' हा शब्द एफएसएस कायदा 2006 किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियम/नियमांनुसार कुठेही परिभाषित किंवा प्रमाणित केलेला नाही. त्यामुळे एफएसएसएआयने सर्व ई-कॉमर्स एफबीओ ना त्यांच्या संकेतस्थळावरील  'हेल्थ ड्रिंक्स/ एनर्जी ड्रिंक्स' या श्रेणीतून अशी पेये वगळून  किंवा डी-लिंक करून हे गैर-वर्गीकरण त्वरित दुरुस्त करण्याची सूचना केली आहे आणि अशी उत्पादने विद्यमान कायदा अंतर्गत  योग्य श्रेणीत ठेवायला सांगितले आहे.

प्रोप्रायटरी फूड्स म्हणजे अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न उत्पादन मानके आणि अन्न मिश्रित पदार्थ) नियम आणि अन्न सुरक्षा आणि मानके (आरोग्य पूरक, न्यूट्रास्युटिकल्स, विशेष आहारातील वापरासाठी अन्न, विशेष वैद्यकीय उद्देशासाठी अन्न, आरोग्यदायी पदार्थ  आणि नवीन अन्नपदार्थ ) नियमनानुसार  प्रमाणित नसलेले खाद्यपदार्थ मात्र ज्यात प्रमाणित घटक वापरले जातात.

'एनर्जी' ड्रिंक्स - हा शब्द केवळ फूड कॅटेगरी सिस्टीम (FCS) 14.1.4.1 आणि 14.1.4.2 (कार्बोनेटेड आणि नॉन-कार्बोनेटेड वॉटर बेस्ड फ्लेवर्ड ड्रिंक्स) , उप-नियम 2.10 .6 (2) अंतर्गत प्रमाणित फूड प्रॉडक्ट स्टँडर्ड्स आणि फूड ॲडिटीव्ह रेग्युलेशन 2011 (कॅफिनेटेड पेय) अंतर्गत परवानाकृत उत्पादनांवर वापरण्यास  परवानगी आहे.

या सुधारात्मक कृतीचा उद्देश उत्पादनांचे स्वरूप आणि कार्यात्मक गुणधर्मांबाबत स्पष्टता आणि पारदर्शकता वाढवणे, दिशाभूल करणाऱ्या माहितीला न भुलता ग्राहकांना योग्य  निवड करायला मदत करणे हा आहे.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2016953) Visitor Counter : 81