उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताला कायद्याचे पालन करण्याबाबत कोणत्याही देशाकडून धडे घेण्याची गरज नाही - उपराष्ट्रपती


काही लोक मानवाधिकारांच्या आडून सर्वात वाईट स्वरूपाचे गुन्हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत - उपराष्ट्रपती

कायद्याचे उल्लंघन करणारेच, पीडित असल्याचा दावा कसा काय करू शकतात ? - उपराष्ट्रपती

भ्रष्टाचार हा आता संधी मिळवून देणारा मार्ग राहिला नाही; तर हा तुरुंगात जाण्याचा मार्ग झाला आहे - उपराष्ट्रपती

सणासुदीचा किंवा शेतीचा हंगाम आहे म्हणून भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होऊ नये हा कुठला युक्तिवाद - उपराष्ट्रपती

भारताची न्यायव्यवस्था भक्कम असून तिच्याशी कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही गटाकडून तडजोड केली जाऊ शकत नाही - उपराष्ट्रपती

Posted On: 29 MAR 2024 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 29 मार्च 2024

भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे आणि त्याच्याकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे जिच्याशी कोणतीही व्यक्ती किंवा कोणत्याही गटाकडून तडजोड केली जाऊ शकत नाही उपराष्ट्रपती जगदीप धनखड  यांनी म्हटले आहे.  भारतीय लोकशाही अद्वितीय असल्याचे नमूद करत उपराष्ट्र्पती म्हणाले की, भारताला कायद्याचे पालन करण्याबाबत  कोणाकडून धडे घेण्याची गरज नाही.

आज नवी दिल्ली येथे भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या (आयआयपीए)  70 व्या वर्धापन  दिन सोहळ्याला  संबोधित करताना, धनखड म्हणाले की आज भारतात कायद्यासमोर सगळे समान हा एक नवीन नियम आहे आणि जे स्वत:ला कायद्याच्या वरचढ  समजतात त्यांना कायदा जबाबदार धरत आहे.  मात्र आपल्याला काय दिसते? ज्या क्षणी कायद्याची अंमलबजावणी  सुरु होते , तेव्हा ते लोक रस्त्यावर उतरतात, उच्चरवात वाद घालतात , मानवाधिकारांच्या आडून, वाईट स्वरूपाचे गुन्हे लपवतात आणि हे सगळे आपल्या डोळ्यासमोर घडत  आहे, असे ते म्हणले.

भारतीय न्यायव्यवस्था मजबूत, लोकाभिमुख आणि स्वतंत्र असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सवाल केला , "कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना एखाद्या व्यक्तीने किंवा एखाद्या संस्थेने किंवा संघटनेने रस्त्यावर उतरण्याचे औचित्य काय?"

या मुद्द्यावर सखोल विचारमंथन करण्याचे आवाहन धनखड यांनी केले. लोक अशा वातावरणात  काम करू  शकतील जी कायद्याच्या राजवटीपासून  दूर जाण्याची विनाशी प्रवृत्ती आहे ? कायद्याचे उल्लंघन करणारेच, पीडित  असल्याचा दावा कसा काय करू शकतात ? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यावेळी उपराष्ट्रपतींनी भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या नूतनीकरण केलेल्या संकुलाचे देखील उद्घाटन केले आणि आयआयपीएच्या अनेक प्रकाशनांचे विमोचन  केले.

आयआयपीएचे महासंचालक सुरेंद्र नाथ त्रिपाठी, आयआयपीएचे निबंधक अमिताभ रंजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

R.Aghor/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2016679) Visitor Counter : 94