अर्थ मंत्रालय
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीसाठी सरकारची कर्ज योजना
Posted On:
27 MAR 2024 9:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 27 मार्च 2024
भारत सरकारने, भारतीय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून, आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीसाठी कर्ज घेण्याची योजना अंतिम केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंदाजित बाजारातील एकूण ₹14.13 लाख कोटींच्या कर्जापैकी, ₹7.50 लाख कोटी (53.08%) पहिल्या सहामाहीत दिनांकित रोख्यांद्वारे सार्वभौम हरित रोखे (एसजीआरबीएस ) जारी करून ₹12,000 कोटींसह कर्ज घेण्याची योजना आहे, बाजाराच्या अभिप्रायाच्या आधारे आणि जागतिक बाजार पद्धतींच्या अनुषंगाने, 15 वर्षांच्या कालावधीचे नवीन दिनांकित रोखे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण बाजारातील ₹7.50 लाख कोटींचे कर्ज घेण्याची प्रक्रिया 26 साप्ताहिक लिलावांद्वारे पूर्ण केली जाईल. बाजारातील कर्ज 3, 5, 7, 10, 15, 30, 40 आणि 50 वर्षांच्या रोख्यांच्या माध्यमातून उचलले जाईल. वेगवेगळ्यामुदती अंतर्गत कर्जाचा हिस्सा (एसजीआरबीएससह) असेल: 3-वर्ष (4.80%), 5-वर्ष (9.60%), 7-वर्ष (8.80%), 10-वर्ष (25.60%), 15-वर्षे ( 13.87%), 30-वर्ष (8.93%), 40-वर्ष (19.47%) आणि 50-वर्ष (8.93%).
विमोचन प्रोफाइल सुलभ करण्यासाठी सरकार रोखे बदलणे सुरू ठेवेल.
लिलावाच्या अधिसूचनांमध्ये दर्शविलेल्या प्रत्येक रोख्याच्या तुलनेत ₹2,000 कोटी पर्यंत अतिरिक्त निधी राखण्यासाठी ग्रीनशू पर्याय वापरण्याचा अधिकार सरकार राखून ठेवेल.
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत अर्थखात्याची देयके जारी करून साप्ताहिक कर्ज पहिल्या सात लिलावांसाठी ₹27,000 कोटी आणि या तिमाहीत ₹(-)3,000 कोटींच्या निव्वळ कर्जासह त्यानंतरच्या सहा लिलावांसाठी ₹22,000 कोटी.असणे अपेक्षित आहे. पहिल्या सात लिलावात 91 डीटीबी अंतर्गत ₹12,000 कोटी, 182 डीटीबी अंतर्गत ₹ 7,000 कोटी आणि 364 डीटीबी अंतर्गत ₹ 8,000 कोटी आणि 91 डीटीबी अंतर्गत ₹ 10,000 कोटी आणि ₹ 58 डीटीबी अंतर्गत, ₹ 5000 कोटी रुपयांचे , या तिमाहीत पुढील सहा लिलावांमध्ये 364 DTB अंतर्गत 7,000 कोटींचे साप्ताहिक कर्ज जारी केले जाईल.
S.Patil/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016525)
Visitor Counter : 462